Nanded News, Police saam tv
महाराष्ट्र

Love Story ला झाला विराेध, डार्लिंगला आणलं गावात पळवून; दाेघांनी संपवलं आयुष्य

या घटनेने गावात शोककळा पसरली हाेती.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded Crime News : कुटुंबाने त्यांच्या प्रेमाला (love) विरोध केला. त्यामुळे निराश झालेल्या युवक-युवतीने नुकतीच त्यांची जीवनयात्रा संपवली. दाेघांच्या या कृत्याने प्रेमीयुगलाच्या कुटुंबास मात्र माेठा धक्का बसला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील दर्याबाई उमरी गावात घडली. (Maharashtra News)

अंजली थोरात आणि आकाश वाठोरे असं मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.गावातून तसेच घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार अंजली थोरात ही लहान असताना तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ती हदगांव तालुक्यातील दर्याबाई उमरी या गावात आपल्या आजोबांकडे राहत होती. शिक्षण सुरु असताना तिचे गावातील आकाश वाठोरे या युवकाशी सूत जुळले.

ही गाेष्ट दाेघांच्या कुटुंबियांना समजली. दाेन्ही कुटुंबातून या प्रेम प्रकरणास विरोध झाला. काही दिवसानंतर अंजलीचा विवाह झाला. लग्नानंतर अंजली आणि तिचा पती पुणे येथे राहत होते. परंतु अंजलीचा आकाश बराेबर संवाद सुरु राहिला.

दरम्यान आकाश वाठोर याने अंजलीशी संपर्कात राहून तिला गावी आणले. त्यावेळी दोन्ही कुटुंबियांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु २९ मार्चला दाेघांनी आत्महत्या करुन जीवन संपवले. अंजली आणि आकाशच्या या कृत्याने कुटुंबियांना माेठा धक्का बसला. पोलिसांनी (ता. 5, बुधवार) या घटनेची आकास्मिक मृत्यूची नोंद अशी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : तुझाही संतोष देशमुख करू; हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या डॉक्टरच्या भावावर प्राणघातक हल्ला

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा वाद उफाळला, शरद पवार गटानं चिमटा काढला| VIDEO

Maharashtra Live News Update: शरणू हांडे अपहरण प्रकारणतील सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी

Maharashtra Tourism: माथेरान, महाबळेश्वर विसराल; भंडारा जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Dadar Kabutarkhana: कबुतरांना खायला देणं अंगाशी आलं; १.३२ लाखांचा दंड वसूल | VIDEO

SCROLL FOR NEXT