Santosh Deshmukh Case  Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड सरेंडर होण्यामागे धनंजय मुंडेंच; राजीनाम्यानंतरही दमानिया आक्रमक, काय केली मागणी?

Santosh Deshmukh Case update : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी दमानियांनी केलीय.. मात्र मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी का करण्यात येत आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

Anjali Potdar

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंडेंच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं समोर आलंय. अंजली दमानियांनी धनंजय मुंडे, बालाजी तांदळेसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी केलीय.

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला तीन आठवड्यानंतर पोलिसांनी जेरबंद केलं तर वाल्मिक कराड 22 दिवसांनी पोलिसांना शरण आला.. मात्र प्रकरण वाल्मिक कराडपर्यंत जाऊ नये म्हणून धनंजय मुंडेंनीच बालाजी तांदळेला पोलिसांसोबत शोध मोहिमेत सहभागी होण्यास सांगितल्याचा आरोप दमानियांनी केलाय...एवढंच नाही तर पोलिसांनीच बालाजी तांदळेला पत्र लिहून तपासासाठी सोबत ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय.. त्यामुळे फक्त बालाजी तांदळेच नाही तर मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी दमानियांनी केलीय..

कराडला कुणाची मदत?

मुंडेंच्या सांगण्यावरुन बालाजी तांदळे पोलिसांच्या शोध मोहिमेत सहभागी झाल्याचा आरोप

कराड सीआयडीपुढे शरण येताना शिवलिंग मोराळेची गाडी वापरली

शरण येण्यापूर्वी वाल्मिकला सारंग आधळे माहिती देत असल्याचा आरोप

घुले आणि सांगळेला फरार असताना डॉ. वायभसे पती पत्नीकडून पैशांची मदत

देशमुखांच्या हत्येनंतर तपासात कुचराई केल्याचा एसपी बारगळ यांच्यावर आरोप

खंडणीवेळी पीएसआय राजेश पाटील चाटेच्या कार्यालयात उपस्थित

पीआय भागवत शेलार आणि संतोष गित्तेचा कराडसोबत संबंध असल्याचा आरोप

सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड सुत्रधार असल्याचं म्हटलं आहे... त्यामुळे आता कराड आणि त्याच्या टोळीला मदत करणाऱ्यांना सहआरोपी केलं जाणार का? आणि धनंजय मुंडेंनाही सहआरोपी केल्यानंतर त्यांची आमदारकीही जाणार का? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Liver damage symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर हळूहळू होतंय खराब

SCROLL FOR NEXT