राज्याच्या प्रशासनात खळबळ; बड्या IAS अधिकाऱ्यांचं निलंबन

ias suspended : बड्या IAS अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
ias officer
ias suspendedSaam tv
Published On

राज्याच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.बड्या आयएएस एम देवेंद्र सिंग यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी गुरुवारी आदेश दिले होते. मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगसाठी न आल्याने मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज शुक्रवारी एम देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अधिवेशनात नेमकं काय घडलं?

सुधीर मुनगुंटीवार यांनी महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंद्र सिंग यांच्याविरुद्ध हक्कभंग मांडला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी अर्धातास चर्चेच्या माध्यमातून ऐकले की, मंत्री पंकजा मुंडे या वरिष्ठ मंत्री आहेत. देवराव भोंगळे यांनी प्रदूषणाबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ब्रिफिंगसाठी बोलावले तर परंतु अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी नकार दिला'.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, 'अधिकारी विदेशात असेल तर समजू शकतो, पण गंभीर नसेल तर समजा. तालिका अध्यक्ष यांनी रामशास्त्रींची भूमिका घेत, अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. आज पंकजा मुंडेंवर ही वेळ आली. उद्या मंत्री म्हणून तुम्हाला संधी मिळेल, तेव्हा तुमच्यावरही वेळ येऊ नये'.

मुनंगटीवार यांच्या वक्तव्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, 'माझ्यावर ही वेळ आली तर माझ्या जागी तुमच्या सारखा बुद्धिमान व्यक्ती असो अशी प्रार्थना मी करतो'.

ias officer
आनंद दिघेंचे जवळचे सहकारी, शिवसैनिक उद्धवराव जगताप यांचं निधन

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'अध्यक्षांनी चर्चा करून म्हणाले की सभागृहापेक्षा कुणी मोठा नाही. अधिकारी आणि कर्मचारी हे कामकाजाला महत्त्व देत नसतील तर हे लोकशाहीला घातक आहे. आपण सांगूनही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गंभीरता पोहोचलेली नाही. सहा महिने झाले, माझ्या औचित्याचे उत्तर आलेले नाही. शासनाने कार्यवाही केली आहे. याआधी मुख्य सचिवांविरुद्ध मी हक्कभंग मांडण्याचा इशारा दिला तर लगेच उत्तर आले'.

ias officer
पुणे जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! ९ सराईत गुंडांवर एकाचवेळी मोठी कारवाई

'दोन महिन्यांचे कॅलेंडर तयार करा, मग उत्तर येईल. १० हजार वाघांची ताकद एकीकडे आणि अध्यक्ष महोदयांची ताकद एकीकडे आहे. हक्कभंग समितीला आदेश द्यावे की पुढच्या अधिवेशनापर्यंत निर्णय करावा. नाहीतर हक्कभंग समीती बरखास्त करावी, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com