Anjali Bharti in trouble for offensive statement made about Amrita Fadnavis, apologizes. saam tv
महाराष्ट्र

Anjali Bharti: अमृता फडणवीसांवर बोलताना बरळलली, गुन्हा दाखल होताच ताळ्यावर आली! गायिका अंजली भारतींकडून दिलगिरी व्यक्त

Anjali Bharti Regret On Amrut Fadnavis Statement: अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर अंजली भारती यांनी माफी मागितली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अंजली भारती यांच्या विरोधात भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

अमृता फडणवीस यांच्यावरील वक्तव्यामुळे अंजली भारती वादात अडकल्या आहेत.

आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी गायिका अंजली भारतींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वक्तव्य चुकून झाल्याचे सांगत अंजली भारतींकडून दिलगिरी व्यक्त केली आहे.

पराग ठोबळे, साम प्रतिनिधी

अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणानंतर अंजली भारती वादात अडकल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अंजली भारती यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाल्यापासून अंजली भारती या नॉट रीचेबल आहेत. मात्र त्यांना वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.

एका भीमगीते गायनाच्या कार्यक्रमात अंजली भारतींनी अमृता फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अमृता फडणवीस यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. भाजपाप्रणीत सत्ताधाऱ्यांकडून बलात्काऱ्यांवर मतांच्या राजकारणापोटी कारवाई केली जात नसल्याचा दावा करताना अंजली भारतींनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख करत त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. त्यानंतर अंजली भारती टीकेच्या धनी बनल्या.अमृता फडणवीस यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्या विरोधात भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून अंजली भारती नॉट रिचेबल आहेत. यादरम्यान अंजली भारती यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केलीय. चुकून अनावधानाने तो शब्द उच्चारण्यात आला"असं अंजली भारती म्हणाल्या आहेत. सोशल माध्यमांवर अंजली भारती यांच्याकडून केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केलाय. चित्रा वाघ, रुपाली चाकणकरसह भाजपकडून टार्गेट केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.

कोण आहेत अंजली भारती?

अंजली भारती या विद्रोही गायिका म्हणून ओळखल्या जातात. त्या गौतम बुद्धाच्या अनुयायी आहेत. अंजली भारती या नावाने त्यांचं युट्यूब चॅनल आहे. त्यांचे साधारण सहा लाखांच्या आसपास सबस्क्रायबर्स आहेत.अंजली भारती यांच्या या युट्यूब चॅनलवर आत्तापर्यंत दीड हजारांहून अधिक व्हिडीओ अपलोड करण्यात आलेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी अनेक गाणी यामध्ये गायली आहेत. अमृता फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दादांनंतर राष्ट्रवादीची पॉवर कुणाकडे? पवार आणि राष्ट्रवादी समीकरण कायम राहणार?

Maharashtra Live News Update: शिरपूर पोलिसांची ‘धडाकेबाज’ कामगिरी; बसमधील प्रवाशाचे 50 हजार चोरणारा 4 तासांत गजाआडवाया

ती एक फाइल, वेळ चुकली अन् पुढे घडला हा अनर्थ; अजितदादांसोबत कायम असणाऱ्या व्यक्तीनं सांगितला आदल्या दिवसाचा घटनाक्रम|VIDEO

सगळी स्वप्ने एका क्षणात बेचिराख...दुचाकीवरून परीक्षेला निघाला, उड्डाणपुलावर आक्रित घडलं; अपघातात विद्यार्थ्याचा करूण अंत

बापरे! महिला पोलीस हवालदारानं मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोकळा आणला, पाहुणे-राहुणे खाणार तेवढ्यात...

SCROLL FOR NEXT