Nagpur News , Ashish Deshmukh, Anil Deshmukh, narkhed krushi utpanna bazar samiti
Nagpur News , Ashish Deshmukh, Anil Deshmukh, narkhed krushi utpanna bazar samiti saam tv
महाराष्ट्र

Narkhed Krushi Utpanna Bazar Samiti News : काका - पुतण्याच्या प्रतिष्ठेच्या लढाईत एक मत ठरलं निर्णायक, देशमुख गटाचा जल्लाेष

संजय डाफ

Nagpur News : नरखेड बाजार समितीच्या (Narkhed APMC) सभापती (अनिल देशमुख गट) यांच्या विराेधात आशिष देशमुख यांच्या गटाने अविश्वास प्रस्ताव आणला हाेता. त्यामुळे आज (शुक्रवार) नरखेड बाजार समितीच्या राजकारणाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले हाेते. या घडामाेडीत अनिल देशमुखांच्या गटाने बाजी मारली. (Maharashtra News)

नरखेड बाजार समितीत राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या सभापती पदाच्या विरोधात आशिष देशमुख (ashish deshmukh) यांनी अविश्वास प्रस्ताव आणला हाेता. अनिल देशमुख यांच्या विरोधात ठाकरे गटाचे तीन सदस्य, आशिष देशमुख गटाचे सात आणि राष्ट्रवादीचे फुटलेले तीन सदस्य यांचा अविश्वास प्रस्ताव आला हाेता.

दरम्यान अविश्वास प्रस्तावाच्या वेळेस सभागृहात राडा झाला. यावेळी पोलीसांनी दोघांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली.

१८ सदस्यसंख्या असलेल्या नरखेड बाजार समितीच्या अविश्वास प्रस्तावासाठी एकूण १६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गटाने बाजी मारली. त्यामुळे नरखेड बाजार समितीत अनिल देशमुख गटाचाच सभापती कायम राहणार हे निश्चित झाले.

- एकूण मतदान १६, अविश्वास प्रस्ताव पारीत व्हायला ११ मतं गरजेची होती.

- आशिष देशमुख गटाला १० मतं

- अनिल देशमुख गटाला ६ मतं

- आशिष देशमुख गटाचं एक मत ठरलं अवैध.

- एक मत अवैध झाल्याने अनिल देशमुख गटाचा सभापती कायम.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सोलापुरात स्मार्ट सिटीच्या पाईपांना भीषण आग

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

SCROLL FOR NEXT