Yashomati Thakur SaamTV
महाराष्ट्र

अचलपूर घटनेमागे यशोमती ठाकूर मास्टरमाइंड; अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप

मंत्री यशोमती ठाकूर याच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक दावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती: मंत्री यशोमती ठाकूर याच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक दावा अचलपूर प्रकरणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. १२नोव्हेंबर दिवशी अमरावतीत घडलेल्या मुस्लिम मोर्चामध्ये त्यांचाच हात होता, असे देखील अनिल बोंडे यांनी सांगितले आहे. यशोमती ठाकूर यांचा सहभाग असल्यामुळे त्या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिमांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे. अचलपूर घटनेच्या विरोधात भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली त्यावेळी बोंडे यांनी वरील विधान केले आहे. सध्या अचलपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तसेच जमावबंदीचे आदेशही कायम आहेत. याप्रकरणी सध्या भाजप (BJP) शहराध्यक्षांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे देखील पहा-

काय आहे प्रकरण

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अचलपूर शहरात दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून २ समुदाय पुढे आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी (police) तत्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी २३ जणांना अटक (Arrested) केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अचलपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान याप्रकरणी नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी रात्री विनाकारण बाहेर न निघण्याचं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. या ठिकाणी दगडफेक झाल्याची माहिती असून पोलिसांनी परिस्थितीवर पूर्णता नियंत्रण मिळविले होते. अचलपूर शहरामध्ये सध्या शांतता असून हे प्रकरण आता निवळलं आहे. परतवाडा शहरामध्ये सर्वांनी शांतता ठेवावी, परतवाडा अचल्पुर दोन्ही शहरांमध्ये कलम १४४ जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणीही बाहेर निघू नये निघाल्यास कारवाई करण्यात येईल असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT