Nandurbar News  Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar News : 3 वर्षापासून कामाचा मोबदला नाही; त्रासाला कंटाळून अंगवाडी सेविकेने संपवलं आयुष्य

म्हसावद पोलीस ठाण्यात आद्यपही गुन्हा दाखल झाला नसून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर निकवाडे

Nandurbar Crime News : तीन वर्षापासून मोबदला नाही, अंगणवाडीतील बालकांना पदरमोड करीत पुरविलेला पोषण आहाराची खर्चित रक्कम मिळाली नाही. शिवाय अधिकाऱ्यांकडून होत असलेल्‍या त्रास व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने तोरणमाळच्या घाटात उडी घेत आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकार नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील घडला आहे.

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील जुगणीचा हिरीचापडा या पाड्यावरील अंगणवाडी केंद्रात अलका वळवी ही महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. तिला तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता. पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी तिला मानसिक त्रास दिल्याच्या आरोप मयत अलका वळवीच्या पतीने केला आहे.

अशा वेगवेगळ्या माध्यमातून वर्षानुवर्षे होणारा त्रास आणि गरीबिला कंटाळून अंगणवाडी सेविका अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नंदूरबार जिल्ह्यात घडला आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत मिठात पुरुन ठेवलेला मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही.

याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत महिलेचे पती अमिताभ वळवी यांनी केली आहे. मात्र म्हसावद पोलीस ठाण्यात आद्यपही गुन्हा दाखल झाला नसून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT