अंगणवाडी सेविकांनी शासनाने दिलेले मोबाईल शासनाला केले परत; नवीन मोबाईलची मागणी राजेश भोस्तेकर, रायगड
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांनी शासनाने दिलेले मोबाईल शासनाला केले परत; नवीन मोबाईलची मागणी

आम्हाला नवीन मोबाईल द्या, नवीन अपलोड केलेले पोषण ऍप हे ऍप मराठीमधून द्या आणि रजिस्टर द्या अशी मागणी निवेदनामार्फत अंगणवाडी सेविकांनी शासनाकडे केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड : जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले पॅनासोनिक कंपनीचे मोबाईल वापरण्यास निकृष्ठ आणि नवीन अपलोड केलेले पोषण ऍप हे इंग्रजी मधून असल्याने सेविकांना कामात अडचणी येत आहेत. अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकानी आज अलिबाग पंचायत समिती कार्यालयात असलेल्या आयसीडीसीच्या प्रकल्प अधिकारी यांना आपले मोबाईल परत करून आंदोलन केले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे याबाबत निवेदन अंगणवाडी सेविका शिष्टमंडळाने दिले आहे. आम्हाला नवीन मोबाईल द्या, ऍप मराठी मधून द्या आणि रजिस्टर द्या अशी मागणी निवेदनामार्फत अंगणवाडी सेविकांनी शासनाकडे केली आहे. (Anganwadi workers return the mobile to the government; Demand for new mobiles)

हे देखील पहा -

अंगणवाडी सेविकाचे काम सुलभ आणि जलद व्हावे यासाठी शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविकांना 2019 साली पॅनसोनिक कंपनीचे मोबाईल दिले होते. यासोबत सिमकार्डसोबत मोबाईल रिचार्ज खर्चही शासनामार्फत दिला जात होता. अंगणवाडी सेविकांना मोबाईलमध्ये पोषण ट्रेकर ऍप देण्यात आले होते. या ऍपमध्ये मराठीत पोषण आहार, मुलांची, स्तनदा माता, लसीकरण, सर्व्हे याची माहिती भरली जात होती. त्यामुळे काम सोपे झाले होते. मात्र काही दिवसांनी मोबाईलला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने ते बंद पडू लागले. अनेक अंगणवाडी सेविकानी स्वतः 2 ते 3 हजार रुपये खर्च करून रिपेअर करून घेतले. मात्र तुटपुंज्या मानधनामुळे हा खर्च सेविकांना परवडणारा नाही.

पोषण ट्रेकर ऍप मध्ये बदल करण्यात आला असून हे ऍप आता इंग्रजी मध्ये केले आहे. इंग्रजी मध्ये आता संपूर्ण माहिती भरावी लागत आहे. अनेक अंगणवाडी सेविका यांचे शिक्षण कमी असल्याने इंग्रजीत माहिती भरणे कठीण जात आहे. अंगणवाडी सेविका काम करताना महत्वाचे म्हणजे त्यांना गावाचा सर्व्हे करून माहिती घ्यावी लागते आणि ती माहिती ऍप मध्ये भरावी लागते. मात्र नवीन ऍप मध्ये सर्व्हे ऑप्शन दिला नसल्याने माहिती अपूर्ण राहत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अडचणी निर्माण होत आहे.

शासनाने दिलेला पॅनेसोनिक मोबाईल वापरण्यास निकृष्ठ असून खर्च परवडणारा नाही. त्यामुळे आम्ही हा मोबाईल प्रशासनाकडे परत करीत आहोत. मोबाईल वापरण्यास अंगणवाडी सेविकांची कोणतीही अडचण नाही. मात्र पोषण ट्रेकर ऍप हे मराठीत करावे, शासनाने नवीन मोबाईल द्यावे, रजिस्टर द्यावे ह्या प्रमुख मागण्या सेविकांच्या आहेत. अंगणवाडी सेविकांनी मोबाईल प्रशासनाकडे परत दिल्याने पुन्हा या सेविकांना रजिस्टरवर माहिती भरून सादर करावी लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

Maharashtra Rain Live News : उल्हासनगरमधील जसलोक हायस्कूलजवळील घराची भिंत कोसळली

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

दारूच्या नशेत महिलांनी घातला राडा, मुंबई-पुणे हायवेवर तुफान हाणामारी | VIDEO

SCROLL FOR NEXT