Anganwadi Sevika,  Anganwadi Sevika Stirke
Anganwadi Sevika, Anganwadi Sevika Stirke saam tv
महाराष्ट्र

Anganwadi Sevika Stirke : अंगणवाडी सेविकांच्या काम बंद आंदाेलनास प्रारंभ; राज्यभरात बेमुदत संप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सागर निकवाडे

Anganwadi Sevika Stirke : कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी आजपासून संप पुकारला आहे. या आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका देखील सहभागी झाल्या आहेत. आजपासून बुधवारपर्यंत (ता. 22 फेब्रुवारी) केवळ आहार वाटप करणार असल्याचे सेविकांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण आदींविषयी सेवा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अल्प मानधन मिळते. गेली ४८ वर्षे सेवा देऊनही त्यांचे मूलभूत प्रश्न प्रलंबितच आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकारने अंगणवाडी ताईंचे प्रश्न आपण प्राधान्याने सोडवू असे आश्वासन देऊन प्रजासत्ताकदिनाची तारीखही जाहीर केली होती. मात्र, त्यांनी दिलेला शब्द न पाळल्याने हा संप पुकारण्यात आला आहे.

अंगणवाडी केंद्राचे भाडेही गेल्या वर्षापासून राज्य सरकारकडून न मिळाल्याने अंगणवाड्या बंद करण्याचा तगादा जागा मालक लावत आहेत. ते टाळण्यासाठी अनेक अंगणवाडी ताईंनी कर्ज घेऊन संबंधितांचे भाडे देऊन जागा वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्यप्रदेश, तमिळनाडू, केरळ,कर्नाटक आदी राज्यांतही अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्रापेक्षा (maharashtra) अधिक मानधन मिळते, यामुळे नाराज असलेल्या अंगणवाडी सेविकांनी २३ फेब्रुवारीपासून बेमुदत असहकार आंदोलनाचा निर्धार केला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे गर्भवती मातांना लहान बालकांना पोषण आहार मिळणार नसल्याने आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण हाेण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : PM मोदी देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी आणणार- फडणवीस

Yashwant Killedar MNS | मनसे आणि ठाकरे गट शिवाजी पार्क कुणाला?

Kesar Benefits : केसरचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Dindori Lok Sabha Election | दिंडोरीत शरद पवार गटाची मोठी खेळी; J P Gavit यांची लोकसभेतून माघार

Exercise Tips: व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? या पद्धतीने करा व्यायाम,दिवसभर राहाल फ्रेश

SCROLL FOR NEXT