Nandurbar : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत पपईला सर्वाधिक दर; आजपासून लागू

आवक घटल्याने पपईचे दर महागल्याचे सांगितले जात आहे.
Nandurbar, papaya price
Nandurbar, papaya pricesaam tv

- सागर निकवाडे

Nandarbur : नंदूरबार (nandurbar) येथे व्यापाऱ्यांनी (traders) शेतकऱ्यांच्या (farmers) बैठकीत पपईला (papaya) 17 रुपये प्रति किलो दर निश्चित केला आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर मानला जात आहे. आज पासून नवीन दर लागू होणार आहे. दरम्यान पपईला चांगला दर मिळत असला तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची अवस्था कभी खुशी कभी गम अशी झाली आहे.

Nandurbar, papaya price
Kalaburagi - Mumbai CSMT Train : कलबुर्गीहून रविवारी मुंबईला विशेष ट्रेन; जाणून घ्या कारण

देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यातूनच पपईचे बाजार भाव ठरत असतात. शहादा बाजार समितीमध्ये पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईला 17 रुपये प्रति किलो दर देण्याचे मान्य करण्यात आले. दरम्यान पपईवर आलेल्या विविध विषाणूजन्य रोगांमुळे पपईच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. आवक घटल्याने पपईचे दर महागल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या आठवड्यात पपईचे दर १३ रुपये प्रति किलोने सुरू होते. मात्र आलेल्या विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे पपईच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. आवक कमी झाली आहे त्याचा परिणाम बाजारपेठेत पपईची मागणी वाढली आहे. (Maharashtra News)

Nandurbar, papaya price
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारी उतरणार रस्त्यावर; चक्काजाम आंदाेलनाचा निर्धार

व्यापारी आणि शेतकरी यांच्यात शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक झाली. या बैठकीत पपईच्या दरात चार रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आली. पपईचे दर हे या हंगामातील सर्वाधिक दर आहेत. पपईचे दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पपई उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असला तरी पपईच्या उत्पादनात आलेल्या घटीमुळे शेतकऱ्यांची अवस्था कभी खुशी कभी गम अशी झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com