Anganwadi Worker Saam tv
महाराष्ट्र

Anganwadi Sevika Salary: राज्यातील २ लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला; महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

Anganwadi Sevika Mandhan: राज्यातील तब्बल २ लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला आहेत. एप्रिल महिना संपत आला, तरी देखील अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाहीये.

Satish Daud

Anganwadi Sevika Mandhan Maharashtra

ऐन लोकसभा निवडणूक आणि लग्नसराईची धामधूम सुरू असताना राज्यातील तब्बल २ लाख अंगणवाडी सेविकांचा पगार रखडला आहेत. एप्रिल महिना संपत आला, तरी देखील अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाहीये. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांवर आता आर्थिक संकट ओढवलं आहे. सरकारने तातडीने आमचा पगार करावा, अशी विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मुख्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे.

राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एक लाख अंगणवाड्या आहेत. ज्यामधे सुमारे २ लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार आणि लस देण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात.

मात्र, शासनाकडून अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांचे पगार झाले नसल्यामुळे त्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या मानधनामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मार्च आणि एप्रिलचा पगारच नसल्याने कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे.

जे मानधन आहे, ते पुरेसे नसतानाही तेही जर वेळेत मिळत नसेल तर महिला कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचे असा सवाल अंगणवाडी कर्मचारी महिला करत आहेत. रखडलेले मानधन त्वरीत द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे.

सध्या लग्नसराई व शिक्षणाचा खर्च असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे अपेक्षीत आहे. म्हणून विनाविलंब मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे, असं अंगणवाडी कर्मचारी संघाने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्य निरीक्षण अधिकारी 1.75 लाखांची लाच घेताना ACB च्या सापळ्यात अडकला

Honey Trap: नाशिकनंतर साताऱ्यातही हनी ट्रॅप? 2 माजी मंत्री, मंत्र्याचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये?

Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT