Shiv sena politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

Shiv sena politics : बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंचा फोटो लावल्याने शिंदे सेना आणि ठाकरे सेना आमनेसामने आली आहे. दिघेंच्या फोटोवरुन ठाकरे सेनेने काय आरोप केलेत ? आणि यावरुन कसं राजकारण रंगलंय पाहूया या रिपोर्टमधून...

Girish Nikam

धर्मवीर सिनेमानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आनंद दिघेंवरुन चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारण ठरलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त असलेली शिंदे सेनेची जाहिरात..... बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो या जाहीरातीमध्ये लावण्यात आला. हीच बाब ठाकरे सेनेला खटकली. आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हाप्रमुख होते.त्यांचा फोटो तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता? असा सवाल संजय राऊतांनी केला.

बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी शिंदेंचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्याला शिंदे सेनेनेही प्रत्युत्तर दिलंय. दिघेसाहेब खोट्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय.

आनंद दिघे शिंदेंचं प्रेरणास्थान

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंचं महत्व आणखी वाढवलं असं चित्र आहे. 13 मे 2022 रोजी आनंद दिघे यांच्यावर 'धर्मवीर' नावाचा सिनेमा शिंदेंनी काढला. या सिनेमा पाहण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात आले होते. मात्र त्यांनी सिनेमाचा शेवट पाहिला नाही, अशी चर्चा होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वृत्तपत्रात पंतप्रधान मोदींचं अभिष्टचिंतन करणारा लेख लिहिला आहे. त्यातही त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि नरेंद्र मोदींचं कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी असतं असं म्हटलंय.

2001 साली गणेशोत्सवादरम्यान दिघेंच्या कारला अपघात झाला. ठाण्यातल्या एका रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र दोन दशकानंतरही दिघेंच्या मृत्यूबद्दल अनेकदा चर्चा होत असते. आनंद दिघेंना मारण्यात आल्याचं विधान शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं. इतकंच नाही तर दिघे यांना मारणारे शिवसेना पक्षातील नेते असल्याचा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला होता.

तळागाळातील माणसांसाठी काम करणारे, सामान्यांच्या हाकेला धावणारे आणि धर्मवीर अशी उपाधी मिळालेले दिघे लोकप्रिय होते. मात्र कालांतराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिघेंमध्ये दरी निर्माण झाली होती, अशी चर्चा तत्कालीन राजकारणात होती. आगामी पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दिघेंच्या फोटोचा मुद्दा आणखी तापणार, अशी चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goan Style Recipe: रोज वरण भात कंटाळा आलाय? मग जेवणाला बनवा गोवन स्टाईल आंबट बटाटा रस्सा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Weather: राज्यात थंडी गायब, पाऊस हजर! हवामान विभागाचा नोव्हेंबरसाठी अंदाज काय? VIDEO

Maharashtra Live News Update: इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचे प्रक्षेपण

Tara Sutaria: लाल इश्क...; तारा सुतारियाचा बनारसी साडीतील रॉयल लूक

India vs Australia Hobart T20I: वॉशिंग्टनची अति 'सुंदर' खेळी; टी२०मालिकेत १-१ ने बरोबरी

SCROLL FOR NEXT