Milk Rate Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Milk Rate : दुधाच्या दरात पुन्हा वाढ; किती रुपयांनी महागलं दूध? वाचा...

उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून दुधाच्या दरात वाढ होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महागाईचा आगडोंब सुरू असतानाच आता त्यामध्ये आणखी एक भर पडली. अमुलने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांची वाढ होणार आहे. दूध खरेदी दरातही वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना सुद्धा काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (Milk Rate Latest Marathi News)

म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची तर गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यासंबंधी अमूल आणि मदर डेअरीने अधिकृतपणे याबाबतची माहिती दिली आहे. दूध दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार असला तरी, सर्वसामांन्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे अमूल गोल्ड दुधाचे दर प्रतिलीटर ६२ रुपये, अमूल शक्ती दूध ५६ रुपये, आणि अमूल ताजाचा दर ५० रुपये प्रति लिटर होईल. तर अर्धा लीटर अमूल गोल्ड ३१ रुपये आणि अमूल ताजा २५ रुपयांना तर अमूल शक्तीचा दर २८ रुपये असेल. (Milk Rate Latest News)

अमूल कंपनीचा एकूण खर्च आणि इतर कॉस्ट वाढल्यानं कंपनीने दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. याव्यतिरिक्त गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या खर्चात दरवर्षी २० टक्क्यांनी वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. कंपनीला या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकावा लागणार आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यातही ८ ते ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी अमूल कंपनीने दुधाचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahuri Rasta Roko : नगर- मनमाड महामार्ग रोखला; रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांनी 13 वर्षीय अभिनेत्रीला केली होती किस, सुपरस्टारबद्दल धक्कादायक दावा

धक्कादायक! पोटच्या ३ मुलींचा जीव घेतला, मग आपल्या आयुष्याचाही दोर कापला, आईने का उचललं टोकाचं पाऊल?

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT