Shivsangram : विनायक मेटे साहेब हे आमचं दैवत. त्यांच्याबाबतीत जे घडलं ते आमच्या विचार करण्याच्या पलीकडचं आहे. परंतु त्यांच्या अपघाताची चाैकशी हाेऊन लवकरात लवकर सत्य बाहेर यावे इतकीच अपेक्षा आहे अन्यथा शिवसंग्राम महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरले असा इशारा शिवसंग्रामच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांनी आज येथे (beed) दिला. (Vinayak Mete Latest Marathi News)
आज विनायक मेटे यांच्या अस्थी देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र राक्षसभुवन येथील गोदावरी गंगा नदीत विसर्जित करण्यात आल्या. यावेळी मेटे यांची कन्या आकांक्षा, बंधू त्रिंबक यांच्यासह बहिणी, नातेवाईक आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विनायक मेटे यांच्या अकाली निधनाने मोठी राजकीय आणि सामाजिक हानी झाली असून न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे असं मत आजही अनेकांनी नदी काठी व्यक्त केले.
दरम्यान शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्त्यांनी मेटे यांच्या वाहनास तीन ऑगस्ट दरम्यान शिक्रापूर या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न झाला होता. हा घाट पूर्वीपासूनचं होता. त्यामुळं मेटे साहेबांच्या अपघाताची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सखोल चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा शिवसंग्राम महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरले असा इशारा दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.