Amruta Fadnavis : 'देवेंद्रजी ३०-३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत सहज खायचे' SaamTvNews
महाराष्ट्र

Amruta Fadnavis : 'देवेंद्रजी ३०-३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत सहज खायचे'

देवेंद्र फडणवीस खरचं इतक्या पोळ्या खातात का असा प्रश्न आता उभ्या महाराष्ट्राला पडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या सडेतोड प्रतिक्रियेसाठी आणि वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. राजकीय भाष्य असो अथवा आपल्या पतीवर होणाऱ्या टीकाटिपण्णीबद्दल त्या अत्यंत आक्रमकपणे सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपली मते व्यक्त करत असतात. त्या बऱ्याचदा आपल्या भूमिकांमुळे ट्रोल देखील होतात. मात्र, अश्या ट्रॉलर्सना त्या सडेतोड उत्तरे देत असतात. (Amruta Fadnavis Latest News)

हे देखील पहा :

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची ओळख केवळ एका माजी मुख्यमंत्र्याची बायको एवढीच मर्यादित नसून त्यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून देखील देशभरात ओळख निर्माण केली आहे. त्या एक प्रसिद्ध गायिका व बँकिंग क्षेत्रातील यशस्वी महिला देखील आहेत. त्यांचे प्रत्येक नवीन गाणे म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणीच असते. भाजपविरोधकांकडून (BJP) नेहमीच त्यांच्यावर वैयक्तिक टीका होत असल्याचे आपल्या सोशल मीडियातून दिसून येते. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून मिस फडणवीस या नेहमीच आपली भूमिका ठामपणे मांडत असतात.

सध्या, अश्याच प्रकारे त्यांनी केलेले वक्तव्य अथवा गौप्यस्फोट राज्यात चर्चेचा विषय ठरलाय. अमृता फडणवीस झी वाहिनीवरील (Zee Tv) ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना अमृता फडणवीस यांनी उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ग्लॅमरस पत्नी, सजग आई, प्रेमळ सून, बँकर, निर्मात्या, गायिका, टेबल टेनिस चॅम्पियन, परफॉर्मर अशी अमृता फडणवीस यांची ओळख करून देण्यात आली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची देखील ऑनलाईन हजेरी होती.

यावेळी त्यांनी त्यांच्या किचनमधील आठवणी अगदी दिलखुलासपणे शेअर करत सांगितले की, आमच्या फ्रीजमधून मध्यरात्री अचानक पदार्थ गायब व्हायचे. त्यामुळे मी सीआयडी लावली. मी त्यांची देवेंद्रजींची संगिनी आहे. त्यामुळे मी नवीन कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले आणि आता त्या फ्रीजच्या चाव्या मी माझ्याकडेच ठेवते. असा गमतीदार किस्सा अमृता फडणवीस यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ माजला!

या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने अमृता फडणवीस यांना, देवेंद्रजी एका बैठकीत किती पुरणपोळ्या खाऊ शकतात असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी, "देवेंद्रजी एका बैठकीत ३० ते ३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे" असे मिश्किल उत्तर दिले. मात्र, गंमतीगमती मध्ये दिलेले हे उत्तर राजकीय टीकाटिपण्णीचा आणि ट्रोलिंगचा विषय ठरला आहे. देवेंद्र फडणवीस खरचं इतक्या पोळ्या खातात का असा प्रश्न आता उभ्या महाराष्ट्राला पडला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT