Video : ग्राहकांनो तुम्ही मिठाईमध्ये पिस्ता समजून भेसळयुक्त सडका शेंगदाणा खाताय!

नागपुरात काही भेसळखोरांनी 90 रुपये किलोच्या सडक्या शेंगदाण्याला रंगवून, सुकवून त्याला पंधराशे रु. किलोच्या पिस्ता सारखा बनवण्याचा उद्योगच सुरु केला आहे.
Video : ग्राहकांनो तुम्ही मिठाईमध्ये पिस्ता समजून भेसळयुक्त सडका शेंगदाणा खाताय!
Video : ग्राहकांनो तुम्ही मिठाईमध्ये पिस्ता समजून भेसळयुक्त सडका शेंगदाणा खाताय!SaamTvNews

औरंगाबाद : बोलीभाषेत आपण शेंगदाण्याला गरीबांचा सुकामेवा म्हणतो. मात्र, नागपुरात काही भेसळखोरांनी खरंच शेंगदाण्याला पिस्ता बनवून दाखवलं आहे. शेंगदाण्याला रंगवून, सुकवून पिस्ता बनवण्याचा हा प्रकार अन्न व औषध प्रशासन (Food & Drugs Administration) विभागाच्या पथकाने छापा घालून उघडकीस आणला आहे.

हे देखील पहा :

शेंगदाण्याला घातक रंगाने रंगवून, त्याची कात्रण ( चिप्स ) करून ती मिठायांमध्ये (Sweets) वापरण्याचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा घातलेल्या इमारतीतून तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केला असून नागपुरातील (Nagpur) कोणकोणते मिठाईवाले याचा वापर करत होते याचा तपास आता सुरु करण्यात आला आहे.

Video : ग्राहकांनो तुम्ही मिठाईमध्ये पिस्ता समजून भेसळयुक्त सडका शेंगदाणा खाताय!
पहा Video : नाशिकमध्ये पुष्पाचा धुमाकूळ! पोलिसांच्या निवासस्थानातून चंदनाची चोरी

नागपुरात काही भेसळखोरांनी 90 रुपये किलोच्या सडक्या शेंगदाण्याला रंगवून, सुकवून त्याला पंधराशे रु. किलोच्या पिस्ता सारखा बनवण्याचा उद्योगच सुरु केला आहे. नागपूरच्या बाबा रामसुमेर नगर परिसरातील एका इमारतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जेव्हा पोहोचले. तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्याला घातक हिरव्या रंगात रंगवून पिस्ता सारखे बनवण्याचे प्रकार उघडकीस आले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com