Amravati Teachers Constituency Election Saam Tv
महाराष्ट्र

Political News: माजी मंत्र्यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात, शिक्षक मंतदार संघ निवडणुकीत मोठी अपडेट

Amravati Teachers Constituency Election: अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. माजी मंत्र्यांची मुलगी ही निवडणूक लढवणार आहेत.

Priya More
  • अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत मोठी अपडेट

  • अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना काँग्रेसची उमेदवारी

  • आदिती पोहरे अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक

  • आदिती पोहरे या माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आहेत

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. माजी मंत्र्यांची मुलगी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस पक्षाकडून आदिती पोहरे या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आदिती पोहरे या माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत. अदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे.

६ डिसेंबर २०२६ रोजी विद्यमान अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लवकरच लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीमधील मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

२०२० च्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला होता. तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. तिकीट न मिळाल्यामुळे किरण सरनाईक यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

दरम्यान, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. पण शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या बहिणीला अटक; राजकारणात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: गोवळकोटमध्ये गणेश विसर्जनाच्या दोन अनोख्या परंपरा

Floral Print Saree Designs: ऑफिसपासून लग्नसराईपर्यंत! ट्राय करा 'या' ७ सुंदर आणि हलक्या फ्लोरल साड्या

प्रसिद्ध न्यूरोसर्जनचे अपघाती निधन; महामार्गावर कारचा कोळसा

8th Pay Commission: गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT