Amravati revenge of father death Saam Tv
महाराष्ट्र

बापाच्या हत्येचा बदला घेतला! आरोपी अन् त्याच्या आईला घरासमोरच संपवलं, १० वर्षीय चिमुकल्याचीही बोटं कापली

REVENGE OF FATHER DEATH: तिवसा शहरात धक्कादायक दुहेरी हत्याकांड. रोहन अवझाडने वडिलांच्या हत्येचा बदला घेत मायलेकावर हल्ला केला. अमोल डाखोरे जागीच ठार, तर सुशिला डाखोरे उपचारादरम्यान मृत.

Bhagyashree Kamble

  • तिवसा शहरात धक्कादायक दुहेरी हत्याकांड.

  • रोहन अवझाडने वडिलांच्या हत्येचा बदला घेत मायलेकावर हल्ला केला.

  • अमोल डाखोरे जागीच ठार, तर सुशिला डाखोरे उपचारादरम्यान मृत.

  • हल्ल्यात १० वर्षीय मुलगा हिमांशु जखमी, पोलिसांनी आरोपीला अटक केली.

बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलानं आरोपींची हत्या केली आहे. ही दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात घडली. गेल्या वर्षी आरोपी मुलाच्या वडिलांची हत्या झाली होती. या गोष्टीचा राग मृत बापाच्या मुलाच्या मनात धगधगत होता. या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यानं एक महिला आणि एका पुरूषावर धारदार शस्त्राने वार करत हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सुशिला डाखोरे आणी अमोल डाखोरे अशी मृतकांची नावे आहेत. हे दोघेही मायलेक होते. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून मागील वर्षी अमोल डाखोरे याने सुधाकर अवझाड यांची हत्या केली होती. अवझाड यांच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला संताप अनावर झाला होता. त्यानं बापाच्या हत्येचा बदला घेण्याचे ठरवले.

सुधाकार अवझाड यांचा मुलगा रोहन अवझाड यानं अमोल डाखोरे आणि त्याची आई सुशीला डाखोरे यांची हत्या केली. डाखोरे कुटुंब हे आरोपीच्या शेजारीच राहत होते. आरोपीनं घरासमोरच अमोल आणि त्याच्या आईवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अमोलचा जागीच मृत्यू झाला. तर सुशीला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आजी आणि वडिलांवर हल्ला होत असल्याचं पाहताच हिमांशु डाखोरे (वय १० वर्ष) हा मदतीसाठी धावून गेला. मात्र, मुलाच्या डाव्या हाताची दोन्ही बोटं कापली गेली. जुन्या वैमन्यासातून हा वाद झाला असल्याची माहिती आहे.

या प्रकरणाची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपास करीत पोलिसांनी आरोपी रोहनला काही तासांतच अटक केली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये 'आघाडीला' भगदाड, तब्बल २०० निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

National cancer awareness day: भारतात सर्वाधिक वाढणारे ५ कॅन्सरचे प्रकार; शरीरात 'हे' बदल दिसल्यास लगेच जा डॉक्टरांकडे

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Farah Khan: '…म्हणून फिल्म सेटवर कलाकार प्रेमात पडतात'; फराह खानने सांगितलं बॉलिवूडचं डार्क सिक्रेट

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

SCROLL FOR NEXT