amravati, rain, youth
amravati, rain, youth saam tv
महाराष्ट्र

Amravati Rain : वाठोडा शुक्लेश्वर गावात शिरलं पाणी; मोर्शित युवक गेला वाहून

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Amravati Rain : गेल्या चार दिवसापासून अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे (Rain) अमरावती जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. यादरम्यान पूर्णा प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडण्यात आल्याने पूर्णा नदीला महापूर आला आहे.

यामुळं नदी नाले देखील तुडुंब भरले आहेत. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गाव जलमय झाल आहे. नागरिकांच्या घरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. शेत जमिनी देखील पाण्याखाली आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

काल मध्यरात्री दरम्यान वाठोडा शुकलेश्वर जलमय झाल्यानंतर स्थानिक अधिकारी मात्र या ठिकाणावरून गायब असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर दुसरीकडे मोर्शी शहरात राम मंदिराजवळ लहान पुलावर पाणी वाहते आहे. दरम्यान अभिजित वैद्य या युवकाचा पाय घसरून तो वाहून गेला आहे. त्याचा शोध रेस्क्यु पथकाकडून सुरु असल्याची माहिती प्रशासनानं दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नवी मुंबईतील भाजपचे 300 ते 400 पदाधिकारी देणार राजीनामा, तिकीट वाटपावरून नाराज असल्याची चर्चा

यवतमाळ : सायखेडानजीक 2 ट्रकचा भीषण अपघात, 150 बकऱ्यांसह तिघे जागीच ठार

Shweta Tiwari: संतुर मॉम श्वेताची थायलंड सफर; फोटो...

Water Reserve inside moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा पाच ते आठ पट अधिक पाणी; ISROच्या अभ्यासात मोठा खुलासा

Ratnagiri Tourist Places : उन्हाळ्यात फिरण्यासाठी नयनरम्य ठिकाणे; रत्नागिरीमधील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT