Melghat Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Melghat Water Crisis : तलावाच्या बाजूला खड्डे खोदून भागवताय तहान; मेळघाटच्या मरियमपुर गावात भयानक परिस्थिती

Amravati News : अमरावती जिल्ह्यात ५६ पाणी प्रकल्प आहेत. यामध्ये ४६.२९ टक्के जलसाठा शिल्लक असून २८ प्रकल्प कोरडे पूर्णपणे पडले आहेत. यात सर्वाधिक पाणीटंचाई मेळघाटमध्ये निर्माण झाली आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : पाणी टंचाईची भीषणता दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. यातच मेळघाट परिसरात पाणीटंचाई तीव्र स्वरूपात निर्माण झाली आहे. आदिवासी भाग असलेल्या काही गावांमध्ये तर पाण्याचे ट्रॅकर देखील पोहचणे कठीण झाले आहे. यामुळे आदिवासी बांधवाना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यातच तहान भागविण्यासाठी तलावाच्या बाजूला खड्डे खोदून पाणी भरले जात असल्याचे भीषण वास्तव पाहण्यास मिळत आहे. 

अमरावती जिल्ह्यात ५६ पाणी प्रकल्प आहेत. यामध्ये ४६.२९ टक्के जलसाठा शिल्लक असून २८ प्रकल्प कोरडे पूर्णपणे पडले आहेत.  यात सर्वाधिक पाणीटंचाई मेळघाटमध्ये निर्माण झाली आहे. शासनस्तरावर उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा पोहचू नये; यासाठी चार महिने आधीच नियोजन केले जाते. मात्र उन्हाळ्यात हे नियोजन पूर्णपणे फोल ठरलं आहे. मेळघाट परिसरात असलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  

खड्डे खोदून भागवताय तहान 

अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट मधील मरियमपूर गावातील रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात ८ ते १० दिवस नळ येत नाही. तर प्रशासनाने पाण्याचे टँकर देखील येत नाहीत. त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्यानं हे गावकरी दूषित तलावाच्या काठावर खड्डे खोदून त्याच्या पाझरातून येणारे पाणी पीत आहेत. त्यामुळे अनेकदा गावातील नागरिक आजारी देखील पडले आहे. 

घोटभर पाण्यासाठी पायपीट 

दरम्यान उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने मरियमपुरचा हा तलाव सुद्धा पूर्णपणे आटला आहे. यामुळे या गावातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटले आहे. पर्याय म्हणून आटलेल्या तलावाच्या काठावर विड्याने खड्डे करून यातून थोडं थोडं पाणी काढून महिला हंडा भरतात. यासाठी एक किलोमीटरची पायपीट करत पिण्याचे पाणी घरी नेत तहान भागवित आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या जमीन अर्जावर आज कोर्टात 3 तास सुनावणी

...तरच मी उपोषण सोडणार; सोनम वांगचुक यांनी सरकारकडे केल्या या २ प्रमुख मागण्या

विद्यार्थ्यांची माफी मागा, राहुल गांधींनी सरकारला ठणकावलं; शिक्षणव्यवस्थेवर ठेवलं बोट, आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांकडं वेधलं लक्ष

Kidney Damage : या ७ सवयी करतात तुमच्या किडनीचं नुकसान, आताच सोडा नाहीतर...

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT