Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati : बाप्पाला निरोप देताना घडले अघटित; अमरावती जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

Amravati News : बाप्पाला निरोप देताना चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले होते. तर दुसरीकडे जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढत बाप्पाला विसर्जित करण्यात आले. मात्र या विसर्जनावेळी काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : लाडक्या गणरायाला काल सायंकाळी अनंत चतुर्थीच्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र लाडक्या गणरायाला निरोप देताना काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. यात अमरावती जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घडलेल्या घटनांमध्ये तिघांचा विसर्जनावेळी बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे विसर्जनाच्या उत्साहात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

दहा दिवसांचा गणेशोत्सव पार पाडल्यानंतर लाडक्या गणरायाचे विसर्जन करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. बाप्पाला निरोप देताना चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले होते. तर दुसरीकडे जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढत बाप्पाला विसर्जित करण्यात आले. मात्र या विसर्जनावेळी काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या असून नदीवर विसर्जनासाठी गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात ठिकठिकाणी घडल्या आहेत. अशीच घटना अमरावती जिल्ह्यात देखील घडल्या आहेत.  

दोन तरुण गेले वाहून 

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना गणपती विसर्जनाला अमरावती जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनेत तीन ठिकाणी गालबोट लागले आहे. यामध्ये नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथे युवक करण चव्हाण (वय २२) गणपती विसर्जनच्या वेळी त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दुसऱ्या घटनेत मेळघाटमध्ये धूळघाट रोडवर गडगा नदी पात्रात गणेश विसर्जना वेळी अनिल माकोडे हा युवक वाहून गेला आहे. 

चंद्रभागा नदीत तरुणी बुडाली 

तर तिसऱ्या घटनेत दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी गेलेली तरुणी मुक्ता श्रीनाथ (वय ३२) या तरुणीचा खोल पाण्यात गेल्याने मृत्यू झाला. या तिन्ही घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे गणेश विसर्जनाच्या उत्साहात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

SCROLL FOR NEXT