Amravati Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Accident: अमरावतीमध्ये भरधाव बसने चौघांना चिरडले, एकाचा जागीच मृत्यू; संतप्त जमावाकडून बसची तोडफोड

Priya More

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये भीषण अपघाताची (Amravati Bus Accident) घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये भरधाव बसने चौघांना चिरडले. शहरातील सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडली. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर आज सकाळी हा अपघात झाला. या अपघातामध्ये ९ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तिन्ही महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली.

या अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. तिन्ही जखमी व्यक्तींची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसची तोडफोड केली. सध्या घटनास्थळावर तणावाचे वातावरण आहे. या अपघातामध्ये प्रीतम गोविंद निर्मळे (९ वर्षे) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. प्रीतम बसच्या पुढच्या चाकाखाली आला. तर नर्मदा निर्मळे (६० वर्षे), वैष्णवी संजय निर्मळे आणि नेहा संतोष निर्मळे हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे निर्मळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT