भरत नागणे, साम टीव्ही पंढरपूर
पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर आलीय. टेंभुर्णी रस्त्यावर एका ट्रॅव्हल वाहनाने दिलेल्या धडकेत वारकऱ्याचा मृ्त्यू झालाय. पंढरपूर - टेंभुर्णी रस्त्यावर हा अपघात झालाय. ट्रॅव्हल वाहनाने दिलेल्या धडकेत पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. करकंबजवळ आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
बाबुराव जावणे या वारकऱ्याचा खासगी बसने धडकेत मृत्यू झालाय. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता निर्माण झालेला दिसत आहे. या घटनेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला (Pandharpur Accident) होता. वारकरी बाबुराव जावणे यांचं विठ्ठलदर्शन अधुरंच राहिल्याची घटना घडलीय. कारण वारीत चालताना त्यांचा खासगी बसच्या धडकेत मृ्त्यू झालाय.
पायी चालणाऱ्या वारकऱ्याला खासगी बसची धडक
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी येणाऱ्या वारकऱ्याला एका खासगी बसने धडक दिल्याने जागीच मृत्यू झालाय. ही घटना आज पहाटेच्या सुमार पंढरपूर जवळच्या भोसे गावाजवळ (Warkari Died Tn Travel Accident) घडली. या घटनेत अहमदनगर जिल्ह्यातील कवठा गावातील बाबुराव धोंडिबा जावणे या साठ वर्षीय भाविकाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली (Warkari Accident) आहे.
अपघातामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण
हजारोंच्या संख्येने वारकरी बांधव पंढरपुराक़डे पायी चाललेले आहेत. परंतु या अपघातामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा जीव धोक्यात (Accident News) असल्याचं म्हटलं जातंय. या अपघातामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलीस आणि आरटीओकडून वाहनांना शिस्त लावण्याची गरज असल्याचं बोललं जातंय. आज १४ जूलै रोजी पहाटे ट्रॅव्हल वाहनाने दिलेल्या धडकेत मृ्त्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.