MP Navneet Rana Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana Threatened: खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

Amravati Police: धमकी देणाऱ्या आरोपीला मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथून अटक करण्यात आली आहे.

Priya More

अमर घटारे, अमरावती

Amravati News: खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी (Amravati Police) अटक केली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. धमकी देणाऱ्या आरोपीला मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम विठ्ठल तायवाडे असे नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मागील चार दिवसांपासून आरोपी नवनीत राणा यांना मोबाईलवर फोन करुन जीवे मारण्याची धमकी देत होता. याप्रकरणी नवनीत राणा यांनी आज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांच आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. आरोपीला अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले आहे.

नवनीत राणा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून 8805541949 या मोबाईल क्रमांकावरुन कोणीतरी विठ्ठल राव नामक व्यक्तीचा मला कॉल येत होता. या व्यक्तीने तिवसामधून मी बोलतो आहे असं सांगितलं. तो मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. तू गर्दीच्या ठिकाणी जाते ना त्या ठिकाणी मी कधीही धारधर चाकुने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही अशी धमकी दिली. तसंच, फोनवर अश्लील शिवीगाळ करुन खालच्या भाषेचा वापर केला असल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरुन देखील धमकी देण्यात आली होती. त्यांना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून छगन भुजबळांना धमकीचे मेसेज आले होते. याप्रकरणी पोलीस धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेत होते. अखेर छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इंद्रनील कुलकर्णी (वय ४३ वर्षे) याला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT