Uttar Pradesh Honor Killing Case: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गौंडा जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी ऑनर किलिंगची (Uttar Pradesh Honor Killing Case) घटना घडली आहे. मुलीला प्रियकरासोबत आपत्तीजनक स्थितीमध्ये कुटुंबीयांनी पकडले. त्यानंतर त्यांनी दोघांची देखील हत्या केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील आणि भावाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धानेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहनौन गावामध्ये ऑनर किलिंगची ही घटना घडली. रविवारी रात्री या गावामध्ये राहणारा तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. दोघेही एका खोलीमध्ये होते. त्याचवेळी मुलीचा भाऊ आणि वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्य त्याठिकाणी आले. दोघांनाही आपत्तीजनक स्थितीमध्ये पाहून त्यांचा राग अनावर झाला.
संतप्त झालेले मुलीचे वडील आणि भावाने समाजामध्ये आपली नालस्थी होऊ नये यासाठी दोघांची गळा दाबून हत्या केली. घटनेचे पूरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मुलीच्या मृतदेहाचे अयोध्येमध्ये अंत्यसंस्कार केले. तर तरुणाचा मृतदेह खाटेसह घेऊन गेले. आधी तरुणाचा मृतदेह उसाच्या शेतामध्ये फेकून दिला आणि खाट दुसऱ्या शेतामध्ये फेकून दिली.
तरुणाच्या आईने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. रविवारी संध्याकाळी घराबाहेर पडलेला मुलगा घरी आलाच नाही असे या महिलेने तक्रारीमध्ये सांगितले होते. पोलिसांनी याप्रकरणाची तक्रार दाखल करत तपास सुरु केला. त्याच दरम्यान पोलिसांना रविवारी गावातील एका मुलीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी पाळत आणि इतर माध्यमातून तपास केला असता हे ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी तरुणाच्या आईच्या तक्रारीवरुन मुलीचे वडील कृपाराम आणि भाऊ राघव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.