Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati : सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना हमीभाव द्या; खासदार बळवंत वानखडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Amravati News : मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांना मशागत खर्चसुद्धा वसूल होत नाही. तर दुसरीकडे व्यापारी कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच सोयाबीन खरेदी करत आहे असा आरोप खासदार वानखडे यांनी केला

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: यंदा अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून सोयाबीन पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची देखील परिस्थिती अत्यंत गंभीर असून सध्या खासगी बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. यामुळे सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा; याबाबत खासदार बळवंत वानखडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. 

सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना फक्त तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल इतकाच भाव मिळत आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने सोयाबीनसाठी जाहीर केलेला हमीभाव ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल आहे. या हमीभावानुसार दर मिळावा; यासाठी अमरावती जिल्ह्यात तातडीने शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस  यांच्याकडे पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली.  

तर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा 

दिवाळीपूर्वी शासकीय खरेदी सोयाबीन केंद्र न केल्यास शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करू; असा इशारा देखील त्यांनी दिला. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची कापणीच करता आली नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी सोंगणी केली. त्यांना प्रति एकर केवळ १ ते २ क्विंटल एवढेच उत्पादन मिळाले आहे. सध्याच्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांना मशागत खर्चसुद्धा वसूल होत नाही. तर दुसरीकडे व्यापारी कवडीमोल भावाने  शेतकऱ्यांच सोयाबीन खरेदी करत आहे असा आरोप खासदार वानखडे यांनी केला. 

सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर, शेतकऱ्यांवर नवे संकट
सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. मात्र सोयाबीनला हमीभावा पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली त्यामुळे ७० टक्के शेतकऱ्यांचा मशागत खर्चही निघत नाही. अशात मात्र हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग नव्या संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT