Sambhajinagar Crime : क्षुल्लक कारणातून तरुणाची हत्या; पाच जणांना घेतले ताब्यात

sambhajinagar News : गल्लीत येत असल्याने शुभमने हटकल्याने अमोलला याचा राग आला होता. हा राग मनात धरून अमोलने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मंगळवारी रात्री शुभमला रस्त्यात गाठत हटकल्याचा जाब विचारला
Sambhajinagar Crime
Sambhajinagar CrimeSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : गल्लीत वारंवार येत असल्याने एकाने त्याला हटकले. याचा राग मनात धरून सात जणांनी मिळून तरुणावर धारधार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागद गावात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पाच संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागद गावातील ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डीपीजवळ ही घटना घडली आहे. शुभम रणवीरसिंह राजपूत (वय २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान हत्येच्या घटनेतील मुख्य आरोपी अमोल हा रात्री अपरात्री गल्लीत राहण्यास आलेल्या एका व्यक्तीकडे येत होता. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचे म्हणत शुभमने त्याला हटकले होते. यातून शाब्दिक वाद देखील झाला होता. 

Sambhajinagar Crime
पुण्यातील सरपंचाची फॉर्च्युनर चोरली, भल्या पहाटे पळवली गाडी, CCTV तून घटना उघडकीस

मित्रांच्या मदतीने रस्त्यात संपविले  

दरम्यान गल्लीत येत असल्याने शुभमने हटकल्याने अमोलला याचा राग आला होता. हा राग मनात धरून अमोलने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मंगळवारी रात्री शुभमला रस्त्यात गाठत हटकल्याचा जाब विचारला. यातून वाद होऊन अमोलसह सोबत असलेल्या सहकार्यांनी शुभमच्या मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. यानंतर घटनास्थळावरून सर्वजण फरार झाले होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

Sambhajinagar Crime
Raigad Crime : सोशल मिडीयावरील ओळखीतून विवाहबाह्य संबंध; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या

पाचजण ताब्यात दोघे फरार 

याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघे घटनेनंतर फरार झाले आहेत. अमोल दशरथ निकम, सचिन दशरथ निकम, शंकर दशरथ निकम, ऋषी गोविंद निकम आणि अविनाश गोविंद निकम, बंडू शिवसिंह राजपूत, सतीश संतोष राजपूत अशी आरोपींची नावे आहेत. फरार असलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com