पुण्यातील सरपंचाची फॉर्च्युनर चोरली, भल्या पहाटे पळवली गाडी, CCTV तून घटना उघडकीस

Korgaon Bhima Sarpanch Car Theft News: कोरेगाव भीमा परिसरातील माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची फॉर्च्युनर चोरट्यांनी पळवली. पोलीस तपास सुरू.
Korgaon Bhima Sarpanch Car Theft News
Korgaon Bhima Sarpanch Car Theft NewsSaam
Published On
Summary
  • माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची फॉर्च्युनर चोरट्यांनी पळवली.

  • चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद.

  • पोलीस तपास सुरू.

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. कोरेगाव भीमाचे सरपंच यांची फॉर्च्युनर वाहनाची चोरीची घटना उघडकीस आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

चोरीची धक्कादायक घटना कोरेगाव भीमा परिसरातून उघडकीस आली. संदीप ढेरंगे असे माजी सरपंचाचे नाव आहे. ते कोरेगाव भीमाचे सरपंच होते. ढेरंगे सरपंच यांच्याकडे फॉर्च्युनर कार होती. मात्र, आज सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांची कार चोरीला गेली. यशराज टॉवर परिसरात, कोरेगाव भीमा–पुणे नगर रोडवर, चोरट्यांनी फॉर्च्युनर वाहनावर डल्ला मारला. तसेच वाहन चोरी करून चोर पुण्याच्या दिशेनं पसार झाले.

Korgaon Bhima Sarpanch Car Theft News
“ऑल इज वेल!” रेल्वे स्थानकावर महिलेला प्रसुती कळा, व्हिडिओ कॉलवर डॉक्टरची मदत घेऊन 'रँचो'नं केली डिलिव्हरी

चोरट्यांनी फॉर्च्युनर वाहन चोरी करण्यासाठी आणखी एका वाहनाचा वापर केला होता, अशी प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. ढेरंगे सरपंच यांना फॉर्च्युनर वाहन चोरीला गेल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच फॉर्च्युनर वाहन चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.

Korgaon Bhima Sarpanch Car Theft News
पॉलिथीनमध्ये सापडला शिर नसलेला मृतदेह; ४ पिशवीत शरिराचे तुकडे, टॅटूवरून ओळख पटली, अभिनेत्रीच्या शिराचा शोध अजूनही लागेना

पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात चोरट्यांनी फॉर्च्युनर वाहन चोरी केली असल्याचं निर्दशनास आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर कोरेगाव भीमा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com