Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati : 'सफेद चावल' कोडवर्डने एमडी ड्रग्जची विक्री; अमरावतीतून दोन्ही डिलिव्हरी बॉय ताब्यात

Amravati News : सर्वसामान्य व्यक्ती समोर सुध्दा ते मोबाईलवर 'सफेद चावल' आया, कितना होना, कहां भेजू,असे म्हणून ते शहरातील ग्राहकांपर्यंत एमडी ड्रग्ज पुरवितात,अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: ड्रग्स तसेच अंमली पदार्थांची विक्री करण्यास बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी व विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. यात 'सफेद चावल' हा कोडवर्ड वापरून अमरावती शहरात एम.डी. ड्रग्जची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

सफेद चावल हा कोडवर्ड वापरत बोलावितात आणि हस्तकाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत ती त्याच कोडवर्डने पोहचविण्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरामध्ये उघड झाला आहे. सर्वसामान्य व्यक्ती समोर सुध्दा ते मोबाईलवर 'सफेद चावल' आया, कितना होना, कहां भेजू,असे म्हणून ते शहरातील ग्राहकांपर्यंत एमडी ड्रग्ज पुरवितात,अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आलेली आहे.

दोन डिलिव्हरी बॉय ताब्यात 

या प्रकरणात पकडलेल्या दोन डिलिव्हरी बॉयला न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिक बेग अनिस बेग आणि मोहम्मद रिजवान अब्दुल गणी अशी पोलीस कोठडी मिळालेल्या युवकांची नावे आहेत. अतिक बेग हा शहरातील ग्राहकांना एमडी ड्रग्ज पुरवित असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने रविवारी सायंकाळी अतिक हा नेहरू मैदानात रिक्षाने पोहोचताच त्याला पकडले होते. त्याच्याकडे एमडी ड्रग्ज आणि ऑटो चालकाकडे ईलेक्ट्रीक वजन दुसऱ्याने विक्रीकरिता दिल्याचे त्यांनी काटा आढळला होता. एमडी ड्रग्ज सांगितले होते.

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई 

धाराशिव : तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणेला तामलवाडी पोलिसांनी पुणे शहरातील तळेगाव दाभाडे येथून अटक केली आहे. तर दुसरा फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग सोलापूर बसस्थानकातून ताब्यात घेतला. ५ ऑगस्टपूर्वी सर्व आरोपींना अटक करत मकोका लावा पालकमंत्री सरनाईकांनी अल्टिमेटम दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Income Job: शिक्षण कमी आहे म्हणून टेन्शन घेऊ नका! करा हे 5 कोर्स आणि मिळवा लाखोंचा पगार

मुंबई-नाशिक महामार्गावर थरारक अपघात! 26 वर्षीय तरुण जागीच ठार, चालक कारमध्येच अडकला

Face Care: नॅचरल ग्लो आणि टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी आठवड्यातून २ वेळा वापरा हा फेस पॅक

Navi Mumbai Flamingo: नवी मुंबईत हजारो परदेशी पाहुणे दाखल, फ्लेमिंगो कुठे पाहाल?

Crime News: बायकोचं मित्रासोबत लफडं असल्याचा संशय, नवऱ्याने रचला भयंकर कट, दोस्ताच्या छातीत गोळ्या झाडल्या अन्...

SCROLL FOR NEXT