Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati : घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; २७ चोरीचे गुन्हे उघड

Amravati News : चारही आरापी हे आंतरराज्यीय टोळीतील सदस्य असल्याचे निष्पन्न झाले असून २७ घरफोडींचा चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : मागील काही दिवसांपासून अमरावती शहर व परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. न्यायाधीशाच्या घरी सुद्धा चोरी झाली होती. या टोळीचा पोलिसांकडून तपास सुरु असताना क्राईम ब्रॅचकडून टोळीतील चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अमरावतीमधील २७ घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. 

अमरावती शहर गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले आहे. अटक केलेल्या चार आरोपींनी अमरावती शहरातील तब्बल २७ घरफोडींची कबुली दिली. दरम्यान मागील काही दिवसांपासून हि टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली होती. त्यांनी अनेक ठिकाणी चोरी करत ऐवज लांबविला होता. सातत्याने वाढलेल्या या घटनांबाबत पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आलेला होता. 

चारही आरोपी आंतरराज्यीय टोळीतील सदस्य 

पोलिसांनी केलेल्या तपासात स्थानिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना सर्व आरोपी निष्पन्न केले. टोळीतील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांची सखोल चौकशी केली. यात चारही आरापी हे आंतरराज्यीय टोळीतील सदस्य असल्याचे निष्पन्न झाले असून २७ घरफोडींचा चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

२१ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

आरोपींकडून सोने, कार, रोख असा एकुण २१ लाख ३६ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या अटकेमुळे येथील महिला न्यायाधिशांच्या घरी झालेल्या चोरीचादेखील उलगडा झाला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी महिलेचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिणे व नगदी असा ९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : लाडक्या गणरायाला काजळ लावून नारळ अर्पण करावं; मेषसह ५ राशींच्या लोकांची लॉटरी लागणार

महायुती तुटली? शिंदेसेनेची भाजपविरोधात बंडखोरी

भाजपच्या बंडखोराला घरात कोंडलं! माघारीची भीती, समर्थकांची रणनीती

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात 546 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Saturday Horoscope: 4 राशींचं नशीब पालटणारा! काहींची संकट होणार दूर, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT