अमर घटारे
अमरावती : एका आदिवासी आश्रम शाळेतील पाण्याची टाकी कोसळून झालेल्या अपघातामध्ये एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान या विद्यार्थिनीचे शवविच्छेदन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यास नातेवाईकांचा नकार आहे. या कारणावरून नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आहे.
अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील नागापूर गावात वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा असून या आश्रम शाळेची पाण्याची टाकी कोसळून मोठी दुर्घटना झाल्याची घटना २९ जुलैला दुपारच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत चार विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. तर सुमरती सोमा जामुनकर (वय १४) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शवविच्छेदन करण्यावरून नातलग संतप्त
आदिवासी आश्रम शाळेत पाण्याची टाकी कोसळून मृत झालेल्या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नकार दर्शविला आहे. तर त्यांच्या मूळ धारणी तालुक्यातच मृत मुलीचे शवविच्छेदन व्हावे; अशी मृत मुलीच्या नातेवाईकांची मागणी आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहे.
तोडगा काढण्याची मागणी
दरम्यान मृत मुलीचे नातेवाईक संतप्त झाले असून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच नातेवाईकांचा मोठा जमाव जमला असून येथे गोंधळाचे वातावरण आहे. तर संस्था चालकांनी समोरासमोर येऊन त्यांच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.