Amravati news Saam tv
महाराष्ट्र

Amravati : हरतालिकेच्या पूजेच्या दिवशीच चिमुकलीचा मृत्यू; पूजेसाठी नदीवर गेली असता बुडाली

Amravati news : हरितालिकेच्या दिवशी गावातील काही महिला नदीवर जात असल्याने त्यांच्यासोबत ९ वर्षीय ईश्वरी हि देखील नदीकाठी गेली होती. महिला हरितालिकेची पूजा करण्यात मग्न असताना दुर्दैवी घटना घडली

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: महिलांचा हरितालिकेचा उपवास असल्याने दुपारच्या सुमारास हरितालिका पूजन करण्यासाठी काही महिला नदीवर गेल्या होत्या. त्या महिलांसोबत नदीकाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाकी रायपूर येथे २६ ऑगस्टला घडली. 

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाकी रायपूर येथील पूर्णा नदीपात्रात घडलेल्या घटनेत ईश्वरी दिनेश नांदणे (वय ९) असे नदीत बुडून मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान भाद्रपद तृतीयेला हरितालिका असल्याने महिला हरितालिकेचा उपवास करत असतात. तर काही लहान मुली देखील हा उपवास करत असतात. घरी किंवा मंदिरावर तर काही जण नदीवर जाऊन हरितालिका व्रत पूजन करत असतात. त्यानुसार वाकी रायपूर येथील महिला गावापासून जवळ असलेल्या नदीवर पूजन करण्यासाठी गेल्या होत्या. 

खेळत असताना तोल जाऊन पडली 

हरितालिकेच्या दिवशी गावातील काही महिला पूर्णा नदीवर जात असल्याने त्यांच्यासोबत ९ वर्षीय ईश्वरी हि देखील नदीकाठी गेली होती. महिला हरितालिकेची पूजा करत असताना नदीच्या काठावर खेळताखेळता ईश्वरीचा तोल जाऊन ती नदीपात्रात पडली. यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. घडला प्रकार महिलांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केली; मात्र ईश्वरी हि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. 

घटनेची माहिती गावात समजल्यानंतर गावकऱ्यांनी नदीवर धाव घेतली. तसेच पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. आसेगाव पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. गावातील पोहणाऱ्यांच्या मदतीने रात्री उशिरा तिचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला असून या संदर्भात अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Bigg Boss 19: 'आम्हा दोघांना चंद्र...'; बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलने दिली प्रेमाची कबूली; म्हणाली...

Crime: भयंकर! शेतावर गेलेल्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर दगडाने ठेचून हत्या; भिवंडी हादरले

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट केला नाही, तो दहशतवादी नाही, ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा

Mahima Chaudhary Wedding: 52 व्या वर्षी बोहल्यावर चढणार महिमा चौधरी? कोण आहे तिचा नवरा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT