Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati : कोळपणी करताना विजेचा तार तुटला अन् अनर्थ घडला; शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू 

Amravati News : पीक मशागतीचे काम सुरु असून शेतामध्ये कोळपणीचे काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे. यासोबतच या शेतकऱ्याचे दोन्ही बैल देखील दगावले असून शेतकरी कुटुंबावर मोठा आघात झाला

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतात पिकांच्या मशागतीचे काम सध्या सुरू आहे. मात्र पीक कोळपणी करत असताना वरुड तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. कोळपणीचे काम सुरु असताना अचानक विद्युत तार तुटून पडली. तार अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच औताला जुंपलेले दोन्ही बैल देखील या घटनेत दगावले आहेत. 

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेसखेडा शेतशिवार सदरची घटना घडली आहे. यात श्रीराम बळीराम घोरसे (वय ५२) असे मृत झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. दरम्यान श्रीराम घोरसे हे शेतात सकाळीच काम करण्यासाठी निघून गेले होते. मात्र पिकांमध्ये डवरणी करत असताना विजेची तार अचानकपणे तुटली आणि ती शेतकरी घोरसे यांच्या अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा आणि दोन बैलाचं जागीच मृत्यू झाला आहे. 

शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर 
शेतशिवारांमध्ये शेतमाशागतीचे काम सध्या सुरु आहे. प्रामुख्याने पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पिकांची कोळपणी करत आहे. अशातच शेतात पिकांची आंतरमशागत डवरणी सुरू असताना जिवंत विजेचे तार शेतकऱ्यांच्या व बैलाच्या अंगावर पडल्याने झाला अपघात घडला आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठा आघात पोहचला असून घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. कुटुंबीयांनी 

उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची मागून धडक, एकाचा मृत्यू 
समृद्धी महामार्गावर वाशिममध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक कॅबिनमध्ये अडकून ठार झाला आहे. वाशिमच्या कारंजा जवळ असलेल्या पोहा गावाजवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडोर चॅनल क्रमांक १८८ जवळ हा अपघात झाला आहे. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा  मृतदेह काढण्याच काम गेल्या तासभरा पासून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan Special : बहिण-भावाच्या नात्यात वाढेल गोडवा, रक्षाबंधनला घरीच झटपट बनवा 'ड्रायफ्रूट केक'

Date Night: पहिल्या डेटवर तुमच्या जोडीदाराला 'हे' प्रश्न नक्की विचारा

Astro Tips: संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ कोणती?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी शिवसेना का फोडली? 3 वर्षानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली आतली बात

Ind vs Eng : कॅच सुटला की, मॅच? मोहम्मद सिराजची मोठी चूक अन् इंग्लंडला मिळालं जीवनदान, शुभमन गिल भडकला; Video

SCROLL FOR NEXT