amravati, vehicles, road closed saam tv
महाराष्ट्र

Amravati News : ब्राह्मणवाडा थडी ते शिरसगाव कसबा रस्ता वाहतुकीसाठी झाला बंद; जाणून घ्या कारण

नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : चांदुर बाजार (chandur bazar) तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे आज (शुक्रवार) तीन दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे पाणी सोडण्यात आले असून परिणामी नदीला पुर आला आहे. (Maharashtra News)

ब्राह्मणवाडा थडी येथील मुख्य मार्गावरील पुलाचे बांधकाम गेल्या तीन महिन्यांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. आज चांदुर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे आज (शुक्रवार) तीन दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडल्याने माेठ्या प्रमाणात पाणी नदीत आले. ब्राह्मणवाडा थडी ते शिरसगाव कसबा (brahmanwada thadi to shirajgaon kasba road closed) या मार्गावरील दोन चाकी वाहतूक वगळता सर्व वाहतूक बंद पडली आहे.

दरम्यान हा मार्ग तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांना जाेडला जात असल्याने या मार्गावरील चार चाकी तसेच वाहतुकदारांची रस्ता तात्पूरता बंद झाल्याने माेठी अडचणी झाली आहे. वाहनधारकांनी पाणी कमी झाल्यानंतरच वाहने पुढे न्यावीत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: हिवाळ्यात कमी पाणी पिण्याची चूक किडनीसाठी ठरू शकते महागात; कशी घ्याल स्वतःची काळजी?

विद्यार्थ्यांना शिक्षा कराल तर खबरदार! शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी नवी नियमावली जारी

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद

लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा धुडगूस; नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण, एकाला जबर मारहाण करून लुटलं

Bombay Masala Sandwich Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा बॉम्बे मसाला सँडविच, वाचा झटपट होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT