शिंदेच घेतायत 500 कोटींचा शोध, जरांगे आणि शिंदेचं नेतृत्व संपवण्याचा डाव-माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

Rs 500 Crore Audio Clip Row: जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपाला आता खासदार श्रीकांत शिंदेंनी स्वत: उत्तर दिलयं...मात्र श्रीकांत शिंदेंच्या विधानानंतर 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बद्वारे नेमकं कुणाला संपवण्याचा कट होता? पाहा यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Maharashtra Politics Heats Up Over Rs 500 Crore Audio Clip
Maharashtra Politics Heats Up Over Rs 500 Crore Audio Clipsaam tv
Published On: 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून वादंग निर्माण झालाय...यावरून भाजप आणि शिंदेसेनेत जोरदार जुंपलीय. मात्र आता शिंदेंनीच या ५०० कोटींचा शोध घेण्याचं ठरवलंय. कारण ज्याच्याकडे 500 कोटी पाठवले होते, तो माझ्यापर्यंत पोहोचलाच नसल्याचं विधान श्रीकांत शिंदेंनी केलंय.. तर दुसरीकडे हे पैसे जर त्यांच्याकडेही पोहचले नसतील तर मग हा परस्पर डाव कुणी रचाल याचा शोध फडणवीस आणि शिंदेंनी घ्यायला हवा अशी मागणी जरांगेंनी केलीय.

दरम्यान या वादात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उडी घेतलीय...मनोज जरांगे-पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचंही नेतृत्व संपवण्याचा हा एक मोठा कुटील डाव असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय...

500 कोटींच्या या वादग्रस्त ऑडिओ क्लिपनंतर भाजप- शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे हा ऑडिओ क्लीपमधून 500 कोटींचा बॉम्ब फोडणारा मास्टर माईंड कोण आहे? नेमकं कोण कुणाला संपवण्याचा कट रचतोय याची खरोखर निष्पक्ष चौकशी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com