Bacchu Kadu vs Ravi Rana on Amravati Lok Sabha constituency Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News : ब्लॅकमेलर, ढोंगी नाटक करणारा, मला पाडण्यासाठी सुपारी घेतली; नवनीत राणांची बच्चू कडूंवर सडकून टीका

Navneet Rana vs Bacchu Kadu : तोडी बहाद्दूर, ब्लॅकमेलर, ढोंगी नाटक करणारा असा उल्लेख करत त्याने मला पाडण्यासाठी सुपारी घेतली, असा घणाघात नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर केला

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांच्यातील वाद काही नवीन नाही. दोन्ही नेते एकमेकांवर सातत्याने टीकेचा भडिमार करतात. लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहारचा उमेदवार उभा केला होता. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन आपला पराभव झाला आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे विजयी झाले, अशी खंत नवनीत राणा यांच्या मनात आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून नवनीत राणा (Navneet Rana) आणि बच्चू कडू यांच्यातील वितुष्ट आणखीच वाढलंय. अशातच नवनीत राणा यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांच्यावर जहरी टीका केली. महाराष्ट्रात काही भाऊ असे आहे जे कोणाला निवडणुकीत पाडण्यासाठी सुपारी घेतात, असं नवनीत राणा म्हणाल्या.

सर्वांना माहीत आहे ना कोण सुपारी घेते. तोडी बहाद्दूर, ब्लॅकमेलर, ढोंगी नाटक करणारा असा उल्लेख करत त्याने मला पाडण्यासाठी सुपारी घेतली, असा घणाघात देखील नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू (Mla Bacchu Kadu) यांच्यावर केला. यांच्यामुळेच माझा जिल्हा 10 वर्ष विकासापासून मागे केला, असंही त्या म्हणाल्या.

बच्चू कडू यांच्या मतदारसंघात 20 वर्षांपासून विकास झालेला नाही. त्या तोडीबाजाने कुठल्याही तरुणाला रोजगार दिला नाही. आगामी निवडणुकीत माझ्या सगळ्या भावाने हिशोब घेतला पाहिजे, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला. परतवाडा येथील दहीहंडी सोहळ्यात नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात भाजपचे आमदार टी राजा यांची देखील उपस्थिती होती. नवनीत राणा माझी बहीण असून मी त्यांच्या पराभवाचा हिशोब घेणार, असा इशारा त्यांनी दिला. आपण ही अर्धी जन्माष्टमी साजरी करत आहोत. जेव्हा मथुरा पूर्ण आपल्याकडे येईल तेव्हा खरी जन्माष्टमी साजरी करणार, असंही आमदार टी राजा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll : ठाकरे गटाची तोफ धडाडणार? गुहागर कोण जिंकणार? एक्झिट पोलचा अंदाज आला

Maharashtra Exit Poll: सावंतवाडीमधून शिंदे गटाचे दीपक केसरकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Nallasopara Exit Poll: नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की बहुजन विकास आघाडी कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

World : जगातील 'या' देशात १२ नाही तर आहेत चक्क 13 महिने

VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT