Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu : लायकी नसलेले नेते भाजपमध्ये महत्त्वाच्या पदावर; बच्चू कडू यांची टीका

Amravati News : नुकताच मुख्यमंत्री यांनी रवी राणांनी महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकू नये; असं वक्तव्य केलं. यावर बच्चू कडू यांनी बोलताना राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: ज्यांनी ज्यांनी भाजपची पायाभरणी केली, ते आता राहिले नाही. जुनी बीजेपी राहिलेली नाही. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा या भाजपचा झेंडा घेऊन फिरत आहेत. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. म्हणजे ज्यांची कवडीची लायकी नाही; ते भाजपच्या महत्वाच्या पदावर असल्याचे म्हणत प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. 

नुकताच मुख्यमंत्री यांनी रवी राणांनी महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकू नये; असं वक्तव्य केलं. यावर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी बोलताना राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. आमदार कडू म्हणाले, कि दर्यापूर येथे राणा दाम्पत्यांनी भाजप बंडखोर युवा स्वाभिमान पक्षाकडून उभा केला. तर अमरावतीमध्ये देखील एका उमेदवाराला समर्थन दिले. अमरावतीत राणा दाम्पत्याने भाजप खतम केली. भाजपचे जे जुने कार्यकर्ते होते ज्यांनी बीजेपी उभारली, ते जगदीश गुप्ता, तुषार भारतीय यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जुनी बीजेपी कुठे राहिलेले नाही. 

युवा स्वाभिमान पक्ष वाढविण्याचे काम करताय 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या (Navneet Rana) नवनीत राणा व विधानसभेत पराभव झालेले काल परवाच पक्षात आलेले अनिल बोंडे, ज्यांची कवडीची लायकी नाही ते आज महत्त्वाच्या पदावर आहेत. अमरावतीत राणा परिवाराने (BJP) भाजप खतम करून युवा स्वाभिमान पक्ष वाढवण्याचं काम करत आहे. हे भाजपच्या लक्षात येत नाही; हे मोठे दुर्दैव आहे; अशी प्रतिक्रिया प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

SCROLL FOR NEXT