Amravati Bhiwapur Dam News Saam TV
महाराष्ट्र

Amravati News : मित्रांसोबत पोहोयला गेला अन् घात झाला; भिवापूर धरणात बुडून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Amravati Bhiwapur Dam News : भिवापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अमरावती जिल्ह्यात घडली.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

अमरावती जिल्ह्यातील भिवापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना गुरुवारी (ता. ४ जुलै) सायंकाळच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून घटनेत दोघांचा जीव वाचला. अक्षय नसकरी (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय हा आपल्या दोन मित्रासोबत धरणावर फिरायला आला होता. धरणातील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे अक्षयसह त्याने इतर दोन मित्र पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले.

यातील दोघे कसाबसा आपला जीव वाचवून पाण्याबाहेर आले. मात्र, अक्षय हा खोल पाण्यात बुडू लागला. त्याचा जीव वाचवण्यासाठी मित्रांनी आरडाओरड केली. जवळ कुणीही नसल्याने अक्षयचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शोधपथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रेस्क्यू टीमनी घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अक्षयचा मृतदेह हाती लागला.

अक्षयचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करीता पोलिसांच्या हवाली केला. शोधकार्य पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान, सध्या धरणांमधील पाणासाठ्यात वाढ होत असल्याने कुणीही पोहण्याचे धाडस करून पाण्यात उतरू नये, असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT