Love Jihad Navneet Rana  Saam TV
महाराष्ट्र

Amravati: तथाकथित लव्ह जिहाद प्रकरणाला वेगळं वळण; तरुणीचे खासदार नवनीत राणांवरच आरोप

Amravati Love Jihad Case: या प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी लव्ह जिहादचा आरोप केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे, साम टिव्ही

अमरावती: ६ सप्टेंबर ला १९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. ७ सप्टेंबरला खासदार नवनीत राणा (Navneet Rana) राजापेठ पोलिस ठाण्यात पोहचल्या आणि पोलिसांवर संताप व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरण लव्ह जिहादच असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि खासदार नवनीत राणा यांनी केला होता. अखेर ती मुलगी सातारा येथे आढळून आली. पहाटे ३ वाजता तिला अमरावतीत (amravati) आणण्यात आलं. राजापेठ पोलिसांनी मुलीकडून माहिती घेऊन तिला आई-वडिलांकडे सुपूर्द केलं आहे. यावेळी मुलीने माझ्यासोबत कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं. मी शिक्षणासाठी गेली होती. मला कोणीही पळवून नेलं नव्हतं, माझी बदनामी थांबवा असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी खोटी माहिती दिली असल्याचा आरोप देखील मुलीने केला आहे. (Amravati Love Jihad Case)

दरम्यान अमरावतीतून (amravati) बेपत्ता असलेली हिंदू तरुणी ही स्वत:च घरातून निघून गेली असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलीस (police) आयुक्त आरती सिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. "मला राग आल्याच्या कारणावरून मी घर सोडलं" असा जबाब या तरुणीने सातारा पोलिसांना दिला होता. त्यानंतर तरुणीला सातारा पोलिसांनी अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले. अमरावती पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवत तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे.

अमरावती लव्ह जिहाद काय आहे प्रकरण?

अमरावतीत एका मुलीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलं तापलं होतं. हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर या मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. प्रकरण समोर येताच खासदार नवनीत राणा, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, खासदार अनिल बोंडें यांच्यासह हिंदू संघटनांनी लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केला होता.

इतकंच नाही तर, खासदार नवनीत राणा यांनी या बेपत्ता मुलीवरून पोलीस ठाण्यात २० मिनिटं जोरदार राडा केला होता. जर बेपत्ता झालेली तरुणी सापडली नाही तर, आंदोलन करू असा इशारा देखील राणा यांनी पोलिसांना दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका सोहेल शहा नामक तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पोलिस त्याची कसून चौकशी करीत होते. (Amravati Love Jihad News Today)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT