Yakub Memon Grave: "टायगर अभी जिंदा है"; याकूबच्या कबरीसाठी ट्रस्टींना टायगर मेमनच्या नावाने धमकी

akub Memon's grave beautification row : जझीलने 1 जानेवारी 2020 रोजी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख यांना लेखी तक्रार दिली होती
Yakub Memon Grave Case
Yakub Memon Grave Case Saam TV
Published On

मुंबई: ९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी (Terroist) याकूब मेमनची (Yakub Memon) कबर मिळवण्यासाठी त्याचा नातेवाईक रऊफ मेमन याने टायगर मेमनच्या (Tiger Memon) नावाने ट्रस्टीला धमकी (Threat) दिली होती अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. बडा कब्रस्तानचे माजी ट्रस्टी जझील नवरंगे यांनी सांगितले की, बडा कब्रस्तानमधील कबर जमीन मिळवण्यासाठी त्याला मोस्ट वाँटेड आणि मुख्य आरोपी टायगर मेमनशी बोलण्याची धमकी देण्यात आली होती. टायगर मेमनच्या संपर्कात असलेल्या रऊफ मेमनच्या संपर्काची चौकशी करण्यासाठी जझीलने 1 जानेवारी 2020 रोजी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख यांना लेखी तक्रार दिली होती. (Yakub Memon Grave News)

Yakub Memon Grave Case
अंधश्रद्धेचा कळस! ६ महिन्यांच्या चिमुकलीच्या अंगात देवी येत असल्याची अफवा; दर्शनासाठी लोकांच्या रांगा

या प्रकरणी पोलिसांनी मात्र कोणतीही कारवाई केली नाही. जझीलने पत्रात म्हटल्याप्रमाणे याकूब मेमनचा जवळचा नातेवाईक रौफ मेमन याकूब मेमनची कबर मिळविण्यासाठी धमकावत होता, कारण पूर्वीचे विश्वस्त ही कबर देण्याबाबत नकार देत होते. जझीलने पोलिसांना दिलेल्या पत्रात त्यांनी सांगितले की, टाईगर मेमन आणि याकूब मेमन यांचे ते चुलतभाऊ आहेत. याकूबच्या कबरीसाठी शिवीगाळ करण्यात आली. "याकूब भाई को तो शहादात नसीब हुई, मगर टाईगर भाई अभी जिंदा है, तुम लोग मेरा बढ़ा कब्रिस्तान का काम करके दे वरना टाईगर भाई को बोलके तुम दोनों को ठिकाणे लगा दूंगा. तु जानता नहीं टाईगर भाई क्या चीज है, जो आजतक किसी के हात नहीं आये. तुम दोनों को कब गायब कर देंगे पता भी नहीं चलेगा, तो टाईगर भाई से फोन से बात करो अभी." अशी धमकी बडा कब्रस्तानचे माजी ट्रस्टी जझील नवरंगे यांना देण्यात आली आहे.

Yakub Memon Grave Case
Yakub Memon Grave CaseSaam TV

याकूबची कबर ही सजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याकूबच्या कबरीला मार्बल्स टाईल्स लावले गेले आहेत, तसेच एलईडी दिव्यांनी कबरील सजवण्यात आले आहे. एवढंच नाही तर कबरीच्या सुरक्षेसाठी २४ तास पाहाराही ठेवण्यात आला असल्याचंही समोर आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपने रान उठवत महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत.

Yakub Memon Grave Case
Amravati: कथित लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी स्वगृही परतली; पोलिसांनी जबाब नोंदवत केलं आई-वडिलांच्या स्वाधीन
कोण आहे याकुब मेमन?

याकूब मेमन हा मुंबईतील ९३ बॉम्बस्फोटांचा दोषी आहे. ज्याला 2015 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील बडा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याकूब हा एकमेव दोषी होता ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता त्याच याकुबच्या कबरीचे समाधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमरवरी दगडापासून बनवलेल्या या कबरीवर एलईडी दिवे लावण्यात आले होते. तसेच इथे 24 तास पहारा असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com