Amravati Crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime : अमरावतीत खळबळ; वरीष्ठ लिपिकाची हत्या, पाचजण पोलिसांच्या ताब्यात

Amravati News : अमरावती पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी अवघ्या २४ तासात लावत पाच आरोपींना अटक केली आहे. यात तीन संशयित आरोपी हे विधीसंघर्षित बालक आहेत.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावतीच्या बडनेरा येथे एका महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच तीन विधी संघर्षित बालकासह पाच जणांना अटक केली आहे. मात्र यातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 

अमरावतीच्या बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील तिलक नगर रोडवर नंदुरवा येथील महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. लिपिक पुरी यांची हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तीन मारेकरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. 

हत्येचा अमरावती पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी अवघ्या २४ तासात लावत पाच आरोपींना अटक केली आहे. यात तीन संशयित आरोपी हे विधीसंघर्षित बालक आहेत. संशयितांना पोलिसांनी अटक केली असली तरी ही हत्या सुपारी देऊन घडून आणली असल्याची शंका पोलिसांना आहे. त्यामुळे अद्यापही या हत्याचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

दोन संशयितही जखमी 

दोन आरोपी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहेत. हत्या केल्यानंतर शस्त्राचा मार हाताने लागल्याने दोन आरोपी जखमी झाले होते. त्यानंतर लागलीच या दोन्ही आरोपींनी अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन ते फरार झाले होते. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हत्येमागचे नेमके कारण काय? याचा शोध तपास अमरावती शहर गुन्हे शाखेचे संदीप चव्हाण हे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या बॅनरवर झळकले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो...

Naagin 7 : प्रतीक्षा संपली! 'नागिन ७' ची पहिली झलक, मुख्य भूमिकेत कोण?

Home Price Hike: मुंबई-पुण्यात घराचं स्वप्न महागणार! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, घराची किंमत का वाढतेय?

Buldhana Crime News : जुन्या वैमनस्यातून एकाची भररस्त्यात हत्या; रायपूर पोलिसांकडून तिघांना अटक

Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जोरदार धक्का

SCROLL FOR NEXT