Amravati Crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime : पेट्रोल पंपावरील दरोड्याचे धक्कादायक सत्य आले समोर; पोलिसांकडून तीन तासांत उलगडा, पाच जणांना अटक

Amravati News : दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून पंपावरील कर्मचाऱ्यांकडून ३ लाख ६ हजारांची रोख लंपास केली होती अचानक घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली होती

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागापूर येथील एका पेट्रोल पंपावर रात्री दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली होती. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान याबाबत पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास करत अवघ्या तीन तासात दरोड्यातील सत्य बाहेर आणले आहे. यानंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.  

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव- दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून पंपावरील कर्मचाऱ्यांकडून ३ लाख ६ हजारांची रोख लंपास केली होती. अचानक घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

धक्कादायक सत्य आले समोर 

दरम्यान पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता यामध्ये धक्कादायक सत्य समोर आले आहे. पेट्रोल पंपच्या मॅनेजरनेच या दरोड्याचा कट रचला होता. त्यासाठीचे नियोजन करत त्याच्या चार परिचितांच्या माध्यमातून हा दरोडा घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत दरोड्यातील सत्य समोर आणले आहे. 

पाच जण ताब्यात 

एका पांढऱ्या रंगाच्या इको कारमध्ये काही लुटारू आलेत, त्यांनी मिरची पुड फेकली व दरोडा टाकला होता. दरम्यान घटनेचा तपास करताना मॅनेजरवर संशय आला. यामुळे अधिक चौकशी केली असता मॅनेजरचे कबुली दिली. या प्रकरणी कर्मचारी देखील अनभिज्ञ होते. मात्र सदर प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी मॅनेजरसह पाच जणांना अटक केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये वाघाचा मुक्त संचार, पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

SCROLL FOR NEXT