Amravati Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Crime: उरणनंतर अमरावती हादरली! एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीवर चाकूने सपासप वार; मन सुन्न करणारी घटना

Amravati Police: अमरावतीमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. भरचौकात दिवसाढवळ्या या तरुणाने तरुणीवर चाकूहल्ला केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

अमर घटारे, अमरावती

उरणमधील यशश्री शिंदे हत्याप्रकरणा ताजे असतानाच अमरावतीमध्ये देखील अशीच घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. भरचौकात दिवसाढवळ्या या तरुणाने तरुणीवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावती शहरातील राजापेठ अंडरपासमधील ही घटना आहे. या घटनेमुळे अमरावती शहर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील राजापेठ अंडरपासमध्ये एका तरुणीवर चाकूहल्ला झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून तरुणाने कॉलेजला निघालेल्या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने तरूणीच्या गळ्यावर चाकूने वार केले. जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेच. तरुणीच्या गळ्याला ६ टाके पडले आहेत.

आरोपी तरूण गेल्या काही दिवसांपासून सतत तरुणीचा पाठलाग करायचा आणि तिचा रस्ता आडवायचा. आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची आणि अॅसिड हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती. आज सकाळी तरुणी कॉलेजला निघाली होती. त्यावेळी २४ वर्षीय आरोपी तरुण प्रफुल्ल काळकरने तिचा पाठलाग केला आणि सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर हल्ला केला. तरुणीच्या शरीरावर आणि मानेवर त्याने चाकूने वार केले. तिने आरडाओरडा केल्यामुळे त्याठिकाणी असलेले रिक्षावाले मदतीसाठी धावून आहे.

पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रफुल्लला रिक्षाचालकांनी पकडले आणि चांगला चोप दिला. त्यानंतर त्यांनी आरोपीला अमरावती शहरातील राजपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. जखमी तरुणीवर सध्या अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी सुद्धा तरुणीच्या आई वडिलांनी आरोपीची पोलिसात तक्रार केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर अमरावतीच्या राजपेठ पोलिसात गुन्हा देखील दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT