Jalna Cyber Crime : जालन्यात सायबर चोरांकडून तीन कोटी ७० लाखांचा गंडा; सहा महिन्यात ५९८ जणांची फसवणूक

Jalna News : वेगवेगळी आर्थिक आमिष, प्रेम प्रकरण, ब्लॅकमेलींग यासह इतर प्रकरणात आर्थिक फसवणुक केल्याचे २४ गुन्हे दाखल
Jalna Cyber Crime
Jalna Cyber Crime
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: गेल्या काही दिवसांमध्ये सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. सोशल मीडियावरून संपर्क करून वेगवेगळ्या पद्धतीने आमिष देत फसवणूक केले जात असतात. त्यानुसार जालना जिल्ह्यात मागील सहा महिन्यात तब्बल ५९८ जणांची फसवणूक करण्यात आली असून यात ३ कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

Jalna Cyber Crime
Wardha News : पाय घसरून पडल्याने कार नदीच्या पुरात युवक गेला वाहून; कारंजा तालुक्यातील घटना, शोधकार्य सुरु

जालना (Jalna) जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून गेल्या सहा महिन्यात ५९८ जणांना सायबर गुन्हेगारांनी ३ कोटी ७० लाखांना गंडा घातला आहे. वेगवेगळी आर्थिक आमिष, प्रेम प्रकरण, ब्लॅकमेलींग (Cyber Crime) यासह इतर प्रकरणात आर्थिक फसवणुक केल्याचे २४ गुन्हे दाखल झाले आहेत. या एकूण गुन्ह्यात २७ लाख रुपये होल्ड करण्यात आले. तर १२ लाख रुपये फिर्यादीना परत केले आहे. तर अन्य फसवणुकीच्या गुन्ह्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. 

Jalna Cyber Crime
Bus Accident : खामगाव- शिर्डी बसचा अपघात; दुभाजकाला धडकून पलटी, मोठा अनर्थ टळला

दरम्यान सोशल मीडियावर सुरूवातीला प्रेमाचे आमिष दाखवून त्यानंतर अश्लिल फोटो किंवा व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग होत असल्याच्या देखील घटना समोर येत आहे. यामुळे सोशल मीडियावरून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आमिषाला बळी न पाडण्याचे (Cyber Police) आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com