AMRAVATI MURDER CASE SOLVED: COUSIN ARRESTED FOR KILLING KAJAL INGLE, BODY BURNT TO DESTROY EVIDENCE Saam Tv
महाराष्ट्र

Amravti : धक्कादायक! हत्या केली, मृतदेह पेट्रोल टाकून जाळला; मावस भावानेचं केली बहिणीची निर्घुण हत्या

Amravati Crime News : अमरावतीतील तपोवन जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या हत्येचा उलगडा झाला असून तिच्या मावसभावाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • अमरावतीच्या तपोवन जंगलात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली

  • मृत तरुणीची ओळख काजल जितेंद्र इंगळे

  • मावस भावनेचं केली हत्या

  • ओळख लपवण्यासाठी आरोपीने मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळलं

अमर घटारे, अमरावती

Amravati Kajal Ingle Murder Case अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणाचा अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात मृत तरुणीचा मावसभाऊच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र त्याने बहिणीची हत्या का केली, याचे अद्याप कारण समोर आलेले नाही. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात एका तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप असल्याने सुरुवातीला ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अमरावती शहर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर वेगाने चक्रे फिरवत घटनेचा छडा लावला.

तपासादरम्यान परिसरातील तसेच शहरातील विविध ठिकाणांवरील ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसेच मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. या तपासातून मृत महिलेची ओळख काजल जितेंद्र इंगळे अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान तिचा मावसभाऊ चेतन सुनिल थोरात याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने काजलचा खून केल्यानंतर तिची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला. मात्र गुन्हे शाखेच्या तपासामुळे आरोपीचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. या प्रकरणात आरोपीविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्यासंदर्भातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या आणि पुरावे नष्ट करण्यासाठी फेकून दिलेल्या वस्तूंचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT