Police investigation intensifies in Amravati after hundreds of objectionable videos linked to exploitation case go viral. saam tv
महाराष्ट्र

Amravati Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण, ३५० व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; अयाज मोहम्मदच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला!

Amravati 180-Women Exploitation Scandal: अमरावतीत व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी १८० मुली पीडित असल्याचा दावा केला आहे.

Bharat Jadhav

  • अमरावतीत १८० हून अधिक मुलींच्या शोषणाचा धक्कादायक प्रकार

  • ३५० पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • आरोपीकडून ब्लॅकमेलिंग करून लैंगिक शोषण

अमर घटारे, साम प्रतिनिधी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केलं आहे. अजूनही खरात फाईल्समधून नव-नवीन खुलासे होत आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. एका पक्षाचा नेता असलेला अयाज मोहम्मदनं जवळपास २०० मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. इतकेच नाही त्याने या मुलींसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल केले आहेत. यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

आरोपीचे राजकीय पक्षाशी संबंध

आता हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एमआयएम या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर महापालिका निवडणुकीच्यावेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या स्टेजवर रील बनवताना दिसला होता.

पक्षातील नेत्यासोबत फोटो देखील आहेत. दरम्यान याप्रकरणी हिंदू संघटना आणि संतप्त नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. जर आरोपींना अटक झाली नाही, तर प्रशासन आणि पोलिसांविरुद्ध तीव्र आंदोलन करु, असा इशारा दिला होता.

आरोपीला अटक

अमरावती पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. अचलपूर यायालयाने आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीरला २१ एप्रिलपर्यत म्हणजे ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपीने मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ इतर मित्रांना पाठवले का याचाही शोध पोलीस घेत आहेत.

१८० मुली पीडित, मोठं रॅकेट

राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये सुमारे १८० मुली अडकल्या असण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश मुली अल्पवयीन आहेत. हे प्रकरण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून, हे एक मोठे षडयंत्र असल्याचं बोंडे म्हणालेत.

अत्याचार झालेल्या महिला-मुलींपर्यंत महिला पोलीस पोहोचू शकतात. त्यांच्याकडून मोठी माहिती मिळू शकते. परतवाडा चिखलदरा शहरातील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळू शकतात. गेल्या सहा महिन्यातील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले तर त्यामधून एक मोठा रॅकेट पुढे येईल, असेही अनिल बोंडे म्हणालेत.

तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सोशल मीडियावर अनेक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सुमारे ३५० हून अधिक व्हिडीओ आणि असंख्य आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले आहेत. या प्रकरणामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारी टोळीविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी आता केली जातेय.

मोहम्मद अयान आणि मोहम्मद या नावाच्या तरुणाने तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून, तसेच काही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने अश्लील कृत्ये करायला लावली. त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पीडितांना ब्लॅकमेल करण्याचे काम ही टोळी करत होती.

सायबर सेलकडून मदत

अमरावती ग्रामीण पोलीस दलाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस अधिकारी विशाल आनंद सिंगुरी यांनी सांगितले की, जर अद्याप कोणीही पीडित पुढे येऊन तक्रार नोंदवत नसेल तरी सायबर सेलच्या माध्यमातून पुराव्यांचे गोळा केले जात आहेत. व्हायरल झालेले व्हिडिओ सायबर पोलिसांच्या मदतीने सोशल मीडियावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावाचे ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

Mumbai: म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा, रोखण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3 हजारात दर्शन देणारी टोळी रडारवर

SCROLL FOR NEXT