Amravati Politics Yashomati Thakur Vs Navneet Rana:  Saamtv
महाराष्ट्र

Amravati News: अमरावतीत राडा! नवनीत राणांचा खासदार कार्यालय सोडण्यास नकार, यशोमती ठाकूर संतापल्या; थेट कुलूप तोडून ताबा मिळवला| पाहा VIDEO

Amravati Politics Yashomati Thakur Vs Navneet Rana: नवनीत राणा यांनी कार्यालय सोडण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा मिळवला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. २२ जून २०२४

अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदारांच्या शासकीय दालनावरुन काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नवनीत राणा यांनी कार्यालय सोडण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा मिळवला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे. आत्तापर्यंत खासदार नवनीत राणा यांच्याकडे हे कार्यालय होते. मात्र लोकसभा निवडणुकात झालेल्या पराभवानंतर नियमानुसार नवे खासदार बळवंत वानखडे यांना खासदार कार्यालय द्यायला पाहिजे होते.

मात्र विजयाच्या 17 दिवसानंतर सुद्धा खासदार कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेतली. सुरुवातीला यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त करत कार्यालयाचा ताबा देण्याची विनंती केली.

तरीसुद्धा ताबा दिल्याने थेट खासदार कार्यालयात गाठून बळवंत वानखडे व यशोमती ठाकूर यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी दिल्या तर मागासवर्गीय खासदार असल्याने प्रशासन हे जातिवादपणा करत आहे असा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर 4 हजार कोटींची खैरात, धक्कादायक माहिती समोर | VIDEO

Maharashtra Live News Update: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

बंद बँक खात्यातून पैसे काढायचेत? RBI ने सांगितल्या ३ सोप्या स्टेप्स

Pinga Ga Pori Pinga Video : कुणीतरी येणार येणार गं! प्रेरणा होणार आई, 'पिंगा गर्ल्स'चा आनंद गगनात मावेना

न्याय मागणाऱ्या तरूणाला पोलिसांनी चोपलं; युवकाकडून विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT