Ravi Rana on Bacchu Kadu saam tv
महाराष्ट्र

Ravi Rana News: 'ब्लॅकमेलिंग, वसुलीमध्ये बच्चू कडूंचा पहिला नंबर', रवी राणांचा प्रहार, म्हणाले, माझ्याकडे सर्व हिशोब...'

Maharashtra Politics Latest News: आमदार रवी राणा यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. महायुतीमध्ये बच्चू कडू जागा वाटपासाठी ब्लकमेल करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. १७ जून २०२४

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघातून भाजप नेत्या नवनीत राणा यांना पराभव स्विकारावा लागला. नवनीत राणा यांच्यासमोर काँग्रेसचे बळवतं वानखडे आणि प्रहार संघटनेचे दिनेश बुब यांचे आव्हान होते. निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांचा विजय झाला. या निकालानंतर आमदार रवी राणा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिल्या असून प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यावर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले रवी राणा?

"बच्चू कडू यांनी उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली. त्यांचा उमेदवार उभा करण्यासाठी कुठून कुठून वसुली केली तो सर्व माझ्या हिशोब आहे. तोड्या आणि ब्लॅकमेलिंग करून राजकारण करणे हा चेहरा आता समोर आला आहे. अचलपूर मतदार संघातील जनता खोके, ब्लॅकमेलिंगचा सर्व हिशोब मागणार आहे," असा घणाघात रवी राणा यांनी केला.

तसेच "नवनीत राणा यांचा पराभवाचे आम्ही चिंतन करत आहे. महाराष्ट्रात ब्लॅकमेलिंग, तोडी, वसुलीमध्ये बच्चू कडू यांचा पहिला नंबर आहे. जो चेहरा तुम्ही पाहता तो चेहरा नाही, बच्चू कडू ज्या ताटात खातात तिथे खंजीर खुपसतात. त्यांचे स्वताच्या मतदार संघात डिपॉझिट जप्त झाले आहे. मात्र आत्ताही ते 20 जागा मागून महायुतीला ब्लँकमेल करत आहेत," असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

"मी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांना मी शुभेच्छा देतो. त्यांना ज्या ज्या वेळी नवनीत राणा व माझी गरज भासेल तेव्हा मी त्यांना मदत करेल. रवी राणा हा हमालाचा मुलगा आहे. मी गोरगरीबाच काम करतो. मी जिंकलो काय हरलो काय याचा फरक पडत नाही. जेव्हा जनता ठरवेल तेव्हाच मी पडेल, कोणाच्या सांगण्यावरून मी पडणार नाही.. असेही रवी राणा यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

SCROLL FOR NEXT