Bacchu Kadu On Maratha Reservation Protest Saamtv
महाराष्ट्र

Bacchu Kadu News: मोठी बातमी! बच्चू कडू अंतरवाली सराटीकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार

Bacchu Kadu On Maratha Reservation Protest: राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पाऊल मागे यावं लागेल, त्यासोबत जरांगे पाटलांना सुद्धा मागं यावे लागेल, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. २० जानेवारी २०२४

Maratha Reservation News:

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात चांगलाच तापला आहे. आजपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलकाचे वादळ मुंबईकडे कूच करणार आहे. सरकारकडून मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशातच याप्रकरणी आता महत्वाची बातमी समोर आली असून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अमरावतीमधून अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत.

काय म्हणाले बच्चू कडू?

"मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj jarange Patil) आंदोलनाला बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे. सरकारने धोरणात्मक सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत, त्यांनी ज्या दुरुस्त्या सांगितल्या होत्या त्या दुरुस्त्या केल्या. आता ज्या काही धोरणात्मक अधिसूचना काढायला पाहिजे असे जरांगे पाटलांना वाटते त्या लगेच काढून घ्याव्या, त्यामुळे समाजाचे भलं होईल," असे आमदार बच्चू कडू म्हणालेत.

सरकारने दोन पाऊले मागे घ्यावीत..

तसेच "राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पाऊल मागे यावं लागेल, त्यासोबत जरांगे पाटलांना सुद्धा मागं यावे लागेल, व समाजाचं भलं कसं होईल यादृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत, दिलेला वेळ भरपूर आहे, 54 लाख जातीचे दाखले जे द्यायचे आहे त्यांला थोडा वेळ लागेल.. असे बच्चू कडू (Bacchu Kadu) पुढे बोलताना म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलनामुळे मुंबई जाम होईल...

"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मुंबई जाम होईल ती वेळ सरकारने येऊ देऊ नये, सरकारने तातडीने संपर्क साधून निर्णय घ्यावा, त्या बाबतीत सरकारसुद्धा सकारात्मक आहे, त्यामुळे सरकार जर समोर येत असेल तर जरांगे पाटलांनी सुद्धा चर्चा करून जे चांगलं होऊ शकते ते करावे.." असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT