Police Station Frezarpura अमर घटारे
महाराष्ट्र

Amravati News: गंभीर गुन्ह्यातला आरोपी रुग्णालयातून फरार; ठाणेदारांची तडकाफडकी बदली, दोन अंमलदार निलंबित

Amravati Crime News: आयुक्त आरती सिंह यांनी फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांची तडाकफडकी बदली केली असून दोन पोलिसांना निलंबित केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे, अमरावती

Amravati Latest News: आठ दिवसांपूर्वी अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला चढवला होता. यातील एक आरोपी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान गंभीर गुन्हा (Crime) दाखल असल्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. मात्र हा आरोपी रुग्णालयातून पळून गेला होता. (Amravati Crime News)

याप्रकरणी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी फ्रेजरपुराचे (Amravati) ठाणेदार अनिल कुरळकर यांची तडाकफडकी बदली केली असून दोन पोलिसांना निलंबित केले आहे. ठाणेदार अनिल कुरळकर यांची बदली विशेष शाखेला केली असून फ्रेजरपुराचे (Police Station Frezarpura News) नविन ठाणेदार म्हणून विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांना जबाबदारी दिली आहे. तसेच फ्रेजरपुरा ठाण्यातील पोलीस अंमलदार नईम बेग व संजय डेरे या दोन अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT